Kokan: संगमेश्वरात भरधाव ट्रकची बैलाला धडक;बैलाचे पुढील पाय तुटले

0
29
संगमेश्वरात भरधाव ट्रकची बैलाला धडक

संगमेश्वर ( प्रतिनिधी ):- मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर एका भरधाव ट्रकने बैलाला जबरदस्त ठोकर दिल्याने या बैलाचे पुढील दोन्ही पाय निकामी झाले आणि तो जागेवरच कोसळला . संगमेश्वर येथील काही तरुणांना हे वृत्त कळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि त्या बैलावर प्राथमिक उपचार सुरू केले http://sindhudurgsamachar.in/sindhudurg-रस्ता-सुरक्षा-सप्ताह-का/

संगमेश्वर येथे मोकाट जनावरे महामार्गावरून नेहमीच फिरत असतात . याकडे मालकवर्ग निष्काळजी वागतात. पण अशा मोकाट जनावरांच्या मालकांवर कारवाई करायला कोणालाही वेळ नसल्याने एक एक मोकाट जनावर मृत्यूच्या खाईत लोटले जात आहे . महामार्गावर भरधाव ट्रकने अशीच एका बैलाला जोरदार धडक दिली आणि यामध्ये बैलाचे पुढील पाय तुटले .

हे वृत्त संगमेश्वर येथील तरुणांना कळताच संतोष खातू , निखिल लोध आणि मित्रमंडळींनी तातडीने बैलावर प्राथमिक उपचार केले आणि अशा जनावरांचा सांभाळ करणाऱ्या लोटे येथील गोशाळेजवळ संपर्क साधला . त्यांना विषयाचे गांभीर्य सांगितले आणि टेंपो मधून जखमी बैलाला लोटे गोशाळेत सुखरुप पाठवले . संतोष खातू , निखिल लोध आणि त्यांच्या मित्रमंडळाने दाखविलेल्या माणूसकीबद्दल त्यांचे अभिनंदन करुन कौतूक करण्यात येत आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here