Kokan : सिंधुदुर्गातील सह्याद्रीच्या कड्या कोपऱ्यात राहणाऱ्या व्यक्तीस अमेरिकेतील कृषी क्षेत्रातील डॉक्टरेट पदवी बहाल!

0
120
सिंधुदुर्गातील श्री आजगावकर यांना अमेरिकेतील कृषी क्षेत्रातील डॉक्टरेट पदवी बहाल!
सिंधुदुर्गातील श्री आजगावकर यांना अमेरिकेतील कृषी क्षेत्रातील डॉक्टरेट पदवी बहाल!

सुनिता भाईप / ( सावंतवाडी )
सिंधुदुर्गातील सह्याद्रीच्या कड्या कोपऱ्यात राहणाऱ्या मातीशी निगडित राहून तिच्यावर अतोनात प्रेम करून आपल्या आयुष्यात कृषी क्षेत्रात रंग भरून त्या मातीवर फुलं, फळ आणि भाज्या उगवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या सिंधुदुर्गातील कृषीक्षेत्रात क्रांती करू पाहणाऱ्या एका सर्वसाधारण घराण्यातील व्यक्तीला श्री.अनंत (अण्णा) दिगंबर प्रभू आजगावकर संशोधनात्मक कामगिरी केल्या बद्दल युनिव्हर्सिटी ऑफ अमेरिका कडून कृषी क्षेत्रामध्ये मानत डॉक्टरेट ही पदवी बहाल करण्यात आली. https://sindhudurgsamachar.in/kokan-अर्नाळा-हेल्थ-ट्रस्टश्र/

श्री.अनंत (अण्णा) दिगंबर प्रभू आजगावकर हे आजगावचे सुपुत्र सिंधुदुर्गातील तळ कोकणात आडेली या गावी वास्तव्यास असून गेली कित्येक वर्ष आपल्या आयुष्यात कृषी विभागातील विविध फुले, फळे, पालेभाज्या, वेगवेगळ्या औषधी वनस्पती यावर संशोधन करण्याचा काम करत होते आणि आज त्या प्रयत्नांना यश आले आहे. प्रयत्नांचे फलित म्हणून त्यांना अमेरिकेतील कृषी क्षेत्रातील पदवी बहाल करण्यात आली आहे कृषी क्षेत्रात काम करत असताना आपल्या आयुष्यातली २५ ते ३० वर्ष कृषी क्षेत्रात संशोधन करत होते

सिंधुदुर्गातील मातीला कृषी क्षेत्रातून नवीन आकार देण्याचा प्रयत्न केला आहे त्यांनी लाल भेंडी, ब्राऊन भेंडी, गुलाबी भेंडी, वेलवेट भेंडी, पिस्ता कलर भेंडी, गोल दोडकी, आंबा, काजू, जायफळ, कोकम यावर विविध प्रकारचे संशोधन करून नवीन नवीन अशा २० जाती तयार केले आहेत आणि याची दखल अमेरिकेतील कृषी क्षेत्रातील संशोधन केंद्राने दखल घेतली आणि ही पदवी बहाल करण्यात आली आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here