Kokan: गुर्ला शहरातील पाणी पुरवठा योजनेच्या वाहिन्या बदलणार

0
129
शहरातील पाणी पुरवठा योजनेच्या वाहिन्या बदलणार
शहरातील पाणी पुरवठा योजनेच्या वाहिन्या बदलणार

वेंगुर्ला प्रतिनिधी- वेंगुर्ला नगरपरिषद हद्दीतील नळपाणी पुरवठा योजनेसाठी अल्ट्रासोनिक स्वयंचलित वॉटर मीटर पुरवठा करुन कार्यन्वित करणे व वेंगुर्ला नगरपरिषद हद्दीतील पाणी पुरवठा योजना सुधारीत करणेसाठी शहरातील अस्तित्वातील वितरण वाहिन्या बदलणे (पहिला टप्पा) या  कामांचा भूमीपूजन सोहळा शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांचे हस्ते कॅम्प येथे संपन्न झाला.https://sindhudurgsamachar.in/kokan-पावसाळ्यापूर्वी-जीर्ण-व/

      वेंगुर्ला नगरपरिषदेला १४७ वर्षाची समृद्ध परंपरा लाभलेली असून नगरपरिषदेच्या शिरपेचात मानाचा तुरा ठरावा अशी आणखी दोन कामे शहरात होत आहेत. या कामाच्या भूमिपूजन सोहळ्याला उपस्थित शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांचे स्वागत शिवसेनेचे जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर यांनी केले. यावेळी शिवसेनेचे तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर, शहर प्रमुख उमेश येरम, मुख्याधिकारी परितोष कंकाळ, माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप,  भाजपा तालुका अध्यक्ष सुहास गवंडकर तसेच प्रशांत आपटे, सुनील डुबळे, नम्रता कुबल, अॅड.श्रद्धा बाविस्कर, संतोष परब, डॉ. आर. एम.परब, गणपत केळुसकर, ठेकेदार एस.एल.ठाकूर यांच्यासह नगरपरिषदेचे, अधिकारी कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.

फोटोओळी – नळपाणी वाहिन्या बदलण्याच्या कामाचा शुभारंभ शालेय शिक्षण मंत्री केसरकर यांच्या हस्ते झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here