Kokan : वेंगुर्ला येथे ३० रोजी राष्ट्रीय लोक अदालत     

0
213
खासगी विद्यापीठांना नफेखोरीला मनाई; पाच वर्षांचे आर्थिक हिशेब सादर करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
चेखासगी विद्यापीठांना नफेखोरीला मनाई; पाच वर्षांचे आर्थिक हिशेब सादर करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेशक बाऊन्स प्रकरणांच्या तडजोडीने निपटाऱ्यासाठी १८ जुलै रोजी जिल्हा न्यायालय सिंधुदुर्ग विशेष लोक अदालतीचे आयोजन

वेंगुर्ला प्रतिनिधी-तालुका विधी सेवा समिती, वेंगुर्ला व तालुका बार असोसिएशन, वेंगुर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने उच्च न्यायालय महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांनी दिलेल्या निर्देशांस अनुसरुन व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सिंधुदुर्ग-ओरोस यांच्या मार्गदर्शनानुसार दि. ३० एप्रिल २०२३ रोजी दिवाणी न्यायालय, वेंगुर्ला येथे सकाळी १०.३० वाजता राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.https://sindhudurgsamachar.in/maharshtra-पती-गमाविलेल्या-महिलां/

लोकअदालत पक्षकारांच्या हितासाठी असून त्यातून त्यांना कमीत कमी वेळांत, कमीत कमी खर्चात प्रभावी न्याय मिळू शकतो. ज्या पक्षकारांची प्रलंबित असलेली दिवाणी व फौजदारी प्रकरणे, कौटुंबिक वाद, पोटगी आदी प्रकरणे तसेच वीज वितरण कंपनी, दुरसंचार निगम, वित्तीय संस्था, बँका, ग्रामपंचायत यांनी आपली जास्तीत जास्त प्रकरणे दाखल करून वादपूर्व प्रकरणे तडजोडीने मिटविण्यांत यावी यासाठी पक्षकारांनी उपस्थित राहून खटले मिटवावेत. त्याकरिता संबधितांनी दिवाणी न्यायालय, वेंगुर्ला (दुरध्वनी क्र.०२३६६-२६२७०७) येथे संफ साधावा. ज्या पक्षकारांना आपले प्रकरण चर्चेद्वारे मिटवायचे असेल अशा पक्षकारांनी वादपूर्व चर्चेसाठी या न्यायालयात सकाळी १०.३० वाजता हजर रहावे. या चर्चासत्रामध्ये दिवाणी न्यायाधीश श्रीमती के.के.पाटील, सहदिवाणी न्यायाधीश डी.वाय.रायरिकर व अॅड.व्ही.बी.वेंगुर्लेकर हे मार्गदर्शन करणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here