Kokan: वेंगुर्ले तालुक्यात ठिकठिकाणी डॉक्टर बाबासाहेब जयंती संपन्न

0
83
महिला औद्योगिक काथ्या संस्थेत आंबेडकर जयंती
Kokan: वेंगुर्ले तालुक्यात ठिकठिकाणी डॉक्टर बाबासाहेब जयंती संपन्न

वेंगुर्ला प्रतिनिधी- कॅम्प येथील महिला औद्योगिक काथ्या कामगार सहकारी संस्थेमध्ये भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार, भारतरत्न, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. https://sindhudurgsamachar.in/kokan-ब्रेन-डेव्हलपमेंट-परीक्/

 राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रांतिक सदस्य एम.के.गावडे यांच्या हस्ते डॉ.आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी महिला काथ्या संस्थेच्या व्यवस्थापकीय संचालिका प्रज्ञा परब, सुरेश उमप, श्री.गावडे यांच्यासह अन्य उपस्थित होते.

परुळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १३२ व्या जयंती निमित्ताने विनम्र अभिवादन करण्यात आले. परुळे गौतमनगर येथे  दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते.

 परुळे येथील सामाजिक न्याय भवन येथे महामानवांना वंदन करण्यात आले. यावेळी परुळेबाजार उपसरपंच संजय दूधवडकर, माजी सरपंच तथा सदस्य प्रदिप प्रभू, सदस्य नमिता परुळेकर, प्राजक्ता पाटकर,सुनाद राऊळ, सी.आर.पी.रेणूका परुळेकर तसेच कानू परुळेकर, श्रीधर परुळेकर, जनार्दन परुळेकर, विलास गवई, आत्माराम परुळकर यांसह समाज बांधव उपस्थित होते. गौतमनगर ते ग्रामपंचायत परुळेबाजार अशी रॅली काढण्यात आली. यात चवदार तळे सत्याग्रह हा देखावा लक्षवेधी ठरला.

फोटोओळी-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here