Kokan: श्रीनिवास मयेकरचे विविध परिक्षांमध्ये यश

0
110
Kokan: श्रीनिवास मयेकरचे विविध परिक्षांमध्ये यश
Kokan: श्रीनिवास मयेकरचे विविध परिक्षांमध्ये यश

वेंगुर्ला प्रतिनिधी- वेंगुर्ला शाळा नं.३चा इयत्ता चौथीतील विद्यार्थी श्रीनिवास बाबुराव मयेकर याने युवा संदेश प्रतिष्ठान नाटळ-सांगवे आयोजित सिधुरत्न टॅलेंट सर्च परीक्षेमध्ये १८० गुण मिळवून गोल्ड मेडल मिळविले आहे. तसेच तो जिल्ह्यात आठवा तर तालुक्यात पहिला आला आहे. जिल्हापरिषद सिधुदुर्गच्या वतीने घेतलेल्या ए.पी.जे.अब्दुल कलाम प्रज्ञाशोध परीक्षेमध्ये त्याने २७० गुण प्राप्त करीत तालुक्यात पहिला येण्याचा मान मिळविला आहे.https://sindhudurgsamachar.in/kokan-युवा-दशावतार-नाट्य-लेखिक/

 त्याच्या या यशाबद्दल मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, शाळा व्यवस्थापन समिती व पालकांच्यावतीने त्याचे अभिनंदन करण्यात आले. श्रीनिवास याला या परिक्षांसाठी शिक्षकवृंद तसेच आईवडीलांचेही मार्गदर्शन लाभले.

फोटो – श्रीनिवास मयेकर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here