वेंगुर्ला प्रतिनिधी- पावसाळ्यापूर्वी तुळस पंचक्रोशीतील जीर्ण विद्युत खांब बदलावेत तसेच विद्युत तारांवरील झाडी तोडावी अशा आशयाचे निवेदन सामाजिक कार्यकर्त्या सुजात पडवळ यांनी अन्य महिलांच्या उपस्थितीत वेंगुर्ला वीज अधिका-यांना देण्यात आले. https://sindhudurgsamachar.in/maharasshtra-समृद्धी-महामार्ग-महारा/
तुळस पंचक्रोशीतील गावांमध्ये ब-याच ठिकाणी विद्युत खांब (पोल) जीर्ण झालेले आहेत तसेच काही ठिकाणी विद्युत वाहिनी (लाईन) वर झाडी वाढली असून आगामी पावसाळ्यात वादळी वारे, जोराचा पाऊस यामुळे असे खांब पडून नुकसान तसेच जीवितहानी घडू शकते. त्याचप्रमाणे विद्युत प्रवाह ही खंडीत होऊ शकतो आणि त्याचा त्रास सर्व विज ग्राहकांना होऊ शकतो यासाठी तुळस गावासह पंचक्रोशीतील होडावडा, वजराट, मातोंड, अणसुर, पाल गावात जीर्ण झालेल्या विद्युत खांब (पोल) लवकरात लवकर बदलण्यात यावे तसेच लाईनवर आलेली झाडी साफ करण्यात यावी यासंदर्भात तुळस येथिल सामाजिक कार्यकर्त्या सुजाता पडवळ यांच्या नेतृत्वाखाली गावातील महिलांनी वेंगुर्ला येथिल उपकार्यकारी अभियंता महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनी उपविभाग या कार्यालयास भेट देत येथिल विज अधिका-यांशी चर्चा करून संबंधित कामे पावसाळ्यापूर्वी तातडीने पुर्ण करण्यासंदर्भात निवेदन दिले.
दरवर्षी पावसाळ्यात तुळस गावासह पंचक्रोशीतील गावांमध्ये विज समस्यांना मोठ्या प्रमाणात सामोरे जावे लागते त्यामुळे यावर्षी पावसाळ्यात विज पुरवठा सुरळीत रहावा यादृष्टीने विज वितरण कंपनीने आतापासूनच त्याचे नियोजन करून आवश्यक ती उपाययोजना करावी अशीही मागणी महिलांच्यावतीने करण्यात आली. यावेळी भक्ती आरोंदेकर, विद्या आंगचेकर, मनाली चुडजी आदी महिला उपस्थित होत्या.
फोटोओळी – जीर्ण झालेले विद्युत खांब बदलण्यासाठी सुजाता पडवळ यांनी निवेदन दिले.