वेंगुर्ला प्रतिनिधी – ग्रामपंचायत मातोंड आणि युवा रक्तदाता मित्रमंडळ-मातोंड यांच्यावतीने आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या रक्तदान शिबिरात ३० रक्तदात्यांनी रक्तदान केले. https://sindhudurgsamachar.in/kokan-आशालता-वारंग-यांचे-वृद्/
उद्घाटन सरपंच मयुरी वडाचेपाटकर यांच्या हस्ते झाले. यावेळी डॉ.संजीव लिंगवत, ग्रामपंचायत सदस्य राहुल प्रभू, दिपेश परब, वैभवी परब, खरेदी विक्री संघ चेअरमन ज्ञानेश्वर केळजी, सोसायटी संचालक एम.जी.मातोंडकर, सिद्धार्थ पराडकर, महेश वडाचेपाटकर आदी उपस्थित होते. या रक्तदान शिबिरात उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडी रक्तपेढीचे डॉ.पटेल, मानसी बागेवाडी, प्राजक्ता रेडकर, राजेंद्र गोरा, अनिल खाडे, राहुल जाधव यांचे सहकार्य लाभले. रक्तदात्यांना प्रमाणपत्र व कै. पांडुरंग महादेव नाईक यांच्या स्मरणार्थ साहिल नाईक यांच्यामार्फत सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
शिबिराला सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानचे तालुका उपाध्यक्ष राजेश पेडणेकर, सचिव श्रीकृष्ण कोंडस्कर, खजिनदार भूषण मांजरेकर, भाजप तालुका कार्यकारीणी सदस्य वसंत तांडेल, युवा मोर्चा वेंगुर्ला तालुकाध्यक्ष प्रणव वायंगणकर, तालुका उपाध्यक्ष मनोहर तांडेल, दशरथ गडेकर यांनी भेटदेऊन शुभेच्छा दिल्या. शिबिर यशस्वी होण्यासाठी सरपंच मयुरी वडाचेपाटकर, सदस्य राहुल प्रभू, दीपेश परब, बाबली गवंडे, सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान वेंगुर्ला तालुका कार्यकारीणी सदस्य प्रसाद नाईक, सचिन कोंडये, नितीन परब-तळवडेकर, साहिल परब, काशी परब, साहिल नाईक, देवेश परब, वासुदेव परब, दिगंबर मातोंडकर यांनी मेहनत घेतली.
फटोओळी – रक्तदान शिबिराचे उद्घाटन सरपंच मयुरी वडाचेपाटकर यांच्या हस्ते झाले.