वेंगुर्ला प्रतिनिधी- ओंकार युवक कला क्रीडा मंडळ पेंडूर-सातवायंगणी यांच्यावतीने आयोजित केलेल्या अमृतनाथ दशावतार नाट्य मंडळ म्हापण यांच्या दशावतार नाट्य प्रयोगाच्यावेळी पाट हायस्कुल येथे इयत्ता नववीत शिकत असलेली युवा दशावतार नाट्य लेखिका दिक्षा मराळ या विद्यार्थिनीचा शाल, श्रीफळ, भेटवस्तू, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला आले. पेंडूर गावचे सामाजिक कार्यकर्ते देवा कांबळी, जेष्ठ दशावतार कलाकार राजन गावडे यांच्या हस्ते व सातवायंगणीतील जेष्ठ नागरिक उत्तम वैद्य, नाट्य मंडळाचे मालक गोसावी यांच्या उपस्थितीत हा सत्कार करण्यात आला.
अमृतनाथ दशावतार नाट्य मंडळ २०२३ या वर्षातील नवा नाट्यप्रयोग ‘पंढरीचा पहिला वारकरी‘ सादर करत असून हा संपूर्ण नाट्यप्रयोग दिक्षा मराळ यांचा लेखणीतून साकार झाला आहे. सत्काराला उत्तर देताना कु. मराळ हिने युवा पिढीला संदेश देत मोबाईल कमी व योग्य वापर करून जास्त वाचन करा, चांगल्या गोष्टी आत्मसात करा तरच आपण जीवनात यशस्वी होऊ असे मार्गदर्शन केले तसेच ओंकार युवक कला- क्रीडा मंडळाचे आभार मानले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पेंडूर ग्रामपंचायत सदस्य निलेश वैद्य यांनी केले.
फोटोओळी – देवा कांबळी, राजन गावडे, उत्तम वैद्य यांच्या हस्ते युवा नाट्य लेखिका दीक्षा मराळ यांचा सत्कार करण्यात आला.

