वेंगुर्ला प्रतिनिधी- महाराष्ट्र शासनामार्फत जागतिक वसुंधरा दिवस २२ एप्रिल रोजी साजरा करण्यात येतो. त्या अनुषंगाने २२ ते २८ एप्रिल २०२३ हा आठवडा वसुंधरा आठवडा म्हणून साजरा करण्यात येत आहे. वेंगुर्ला नगरपरिषदेमार्फत वसुंधरा आठवडा या उपक्रमांतर्गत २६ एप्रिल रोजी भव्य सायकल रॅली काढण्यात आली. https://sindhudurgsamachar.in/kokan-श्रीनिवास-मयेकरचे-विविध/
ही सायकल रॅली वेंगुर्ला नगरपरिषद कार्यालय ते हॉस्पिटल नाका-अग्निशमन केंद्र-स्टेडीयम-पॉवर हाऊस-रामेश्वर मंदिर- पिराचा दर्गा- गणपती मंदिर-दाभोली नाका- नगरपरिषद कार्यालय पर्यंत काढण्यात आलेली होती. यावेळी मुख्याधिकारी परितोष कंकाळ, सर्व अधिकारी, कर्मचारी, माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप, वेंगा बॉयजचे डॉ. राजेश्वर उबाळे व इतर पदाधिकारी सहभागी झाले. माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत वसुंधरेचे जतन करण्यासाठी, पंचमहाभुतांचे प्रदुषण कमी करण्याासाठी विविध संदेश देणारे माहिती फलक लावून सदर सायकल रॅली काढण्यात आली. या सायकल रॅलीच्या निमित्ताने पर्यावरणाचे संतुलन राखणेसाठी जास्तीत जास्त नागरिकांनी सायकलचा वापर करावा असे आवाहन मुख्याधिकारी यांनी केले.
फोटोओळी – वसुंधरा आठवडा अंतर्गत वेंगुर्ला नगरपरिषदेने काढलेल्या सायकल रॅलीत मुख्याधिकारी, नगराध्यक्ष, डॉक्टर आदी सहभागी झाले होते.


