Kolhapur: जॉर्जियातील उच्चशिक्षण सोडून, थेट गावात सरपंचपदी : तरूणीचा थक्क करणारा प्रवास!

0
59
जॉर्जियातील उच्चशिक्षण सोडून, थेट गावात सरपंचपदी

सांगली– राजकारण म्हणजे घाणेरडं क्षेत्र असं अनेकांकडून बोललं जातं मात्र या राजकारणात प्रत्यक्ष उतरून, निवडणुकीत सहभागी होऊन परिवर्तन करण्याची अनेकांची तयारी नसते. मात्र याला अपवाद ठरावी, अशी एक घटना आजच्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत एका गावात दिसून आले. https://sindhudurgsamachar.in/maharashtra-राज्यात-डॉक्टर-तंत्रज्/

अमेरिकेतील जॉर्जिया राज्यातून वैद्यकीय उच्चशिक्षण घेऊन आपल्या मायभूमीत परतलेली, यशोधरा महेंद्रसिंह शिंदे ही सांगली जिल्ह्यातील एक तरूणी आहे. सांगलीतील ‘वड्डी’ग्रामपंचायत निवडणुकीत यशोधरा शिंदे थेट सरपंचपदी निवडून आली. तरुण महिला सरपंच म्हणून यशोधरा शिंदेंनी ओळख मिळवली आहे. यशोधरा यांच्या यांच्या पॅनलचाही या ठिकाणी दणदणीत विजय मिळवला.

सुमारे साडे चार – पाच हजार लोकसंख्येचं वड्डी नावाचं सांगली जिल्ह्यातील छोटसं गाव. हे गाव मिरज शहराच्याजवळच आहे. या निवडणुकीत यशोधरा यांनी विकासाच्या मुद्द्यावर गावातील ग्रामपंचायत निवडणुकीत प्रचार केला होता. अमेरिकेतील जॉर्जियात उच्च शिक्षण घेऊन आलेली यशोधराला मतदारांनी थेट सरपंचपदी बसवले.
परदेशाप्रमाणे शुद्ध पिण्याचे पाणी, शिक्षण, आरोग्य आणि नागरी सुविधा ग्रामीण भागापर्यंत का पोहचत नाहीत? गावकऱ्यांना मूलभूत सोयी सुविधा का मिळत नाही? पोहोचत का नाहीत? अशा विचारातून यशोधराने निवडणुकीत सहभाग घेतला.

शाळेत शेकडो विद्यार्थी एकत्रितपणे शिक्षण घेत असताना, या साऱ्यांना मिळून केवळ एकच कॉमन टॉयलेट का असताता? विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेऊन टॉयलेटची संख्या का वाढवता येत नाहीत?परदेशी शाळेत एका ठिकाणी सेनेटरी पॅड उपलब्ध होण्यासाठी यंत्रे बसवलेले असतात. मात्र आपल्या ग्रामीण भागात असे चित्र कुठेच दिसत नाही. असे मुद्दे उचलून निवडणुकीत प्रचार केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here