कोल्हापूर– कोल्हापूरची वरदायिनी असलेल्या पंचगंगा नदीत कोल्हापूरवासीयांसह भाविक, पर्यटकांना लवकरच नौकानयनाचा आनंद मिळणार आहे. पर्यटनाला चालना देण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे पंचगंगेत बोटिंग सुरू करण्यात येणार आहे. त्याद़ृष्टीने प्राथमिक प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. सध्या रंकाळ्यात पर्यटकांना नौकानयनाची सुविधा उपलब्ध आहे. https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-भोगवेहून-वालावल-मार्गे/
पंचगंगा घाट परिसराचे शुशोभिकरण केले जाणार आहे. संपूर्ण घाटावरील दगडी पायर्या नव्याने बांधल्या जाणार आहेत. त्यामध्ये आकर्षक विद्युत रोषणाई केली जाणार आहे. यामुळे येत्या काही दिवसांनंतर पंचगंगेचा घाट दररोज सायंकाळी रोषणाईने उजळून निघणार आहे.कोल्हापुरात सध्या रंकाळा तलावात नौकानयन आहे. त्याचबरोबर पंचगंगा नदीपात्रातही आता नौकानयन सुरू करण्याची प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. पंचगंगा घाट, शिवाजी पूल आणि पंचगंगेच्या पात्रात नावेतून प्रवास, या सर्वांमुळे पंचगंगा घाटही पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार आहे.