Kolhapur: भावी शिक्षक भरतीच्या प्रतीक्षेत! फेब्रुवारी अखेर शिक्षक भरती होणार : दीपक केसरकर

0
41
दीपक केसरकर
महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री सन्माननीय श्री दिपकभाई केसरकर साहेबांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन.

कोल्हापूर- शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर फेब्रुवारी अखेर शिक्षक भरती होणार असल्याचे सांगत आहेत. परंतु, परीक्षेसंबंधी अद्याप कोणतेही परिपत्रक, वेळापत्रक शिक्षण विभागाने जाहीर केलेले नाही. त्यातच नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीची आचारसंहिता फेब्रुवारीपर्यंत आहे. त्यामुळे जाहिरात कधी निघणार व तयारीसाठी पुरेसा वेळ मिळणार का, असा सवाल भावी शिक्षक उपस्थित करीत आहेत.http://sindhudurgsamachar.in/भारतात-फक्त-या-ठिकाणी-च/

शिक्षण विभागाकडून 2012 पासून पूर्ण क्षमेतेने शिक्षक भरती झालेली नाही. राज्यातील शाळांमध्ये शिक्षक नाहीत. काहीजण निवृत्त झाले आहेत. आहेत त्या शिक्षकांवर अतिरिक्त कामाचा बोजा पडत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. 2017 नंतर शिक्षक अभियोग्यता परीक्षा झालेली नाही. अजूनही या परीक्षेतील भरती प्रक्रिया अपूर्ण आहे. तोपर्यंत पुन्हा कोणताही विचार न करता केवळ डीएड, बीएडधारकांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार सरकारकडून सुरू असल्याचा आरोप पात्र उमेदवार करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here