Maharashtra: आयटीआय विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! 40 रुपयांऐवजी 500 रुपये विद्यावेतन मिळणार

0
97
ITI

मुबंई- राज्यातील हजारो औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (ITI) विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारने मोठी घोषणा केली आहे. शासकीय आयटीआय संस्थांमधील विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या दरमहा विद्यावेतनात घसघसीत वाढ होणार आहे. मागील अनेक वर्षांपासून विद्यार्थ्यांना 40 रुपये विद्यावेतन देण्यात येत होते. आता, त्यात वाढ होणार असून 500 रुपयांचे विद्यावेतन देण्याचा प्रस्ताव असल्याची माहिती कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी विधान परिषदेत दिली.https://sindhudurgsamachar.in/maharashtra-बिलिंगच्या-बाबतीत-चांग/

आयटीआय कोर्सेसमध्ये बदल होणार

आयटीआयमधील कोर्सेस हे कालबाह्य झाले असून नवीन कोर्सेस बाबत सरकार पुढील वर्षी घोषणा करणार असल्याची माहिती कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली. राज्यातील 36 जिल्ह्यासाठी एक कमिटी स्थापन केली असून प्रत्येक जिल्ह्यात ज्या कंपन्या आहेत त्या ठिकाणी आवश्यक असणारे कोर्स घेतले जातील, अशी माहिती त्यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here