Maharashtra: इनर व्हील डिस्ट्रिक्टने महिंद्रा ग्रुपच्या पाठिंब्याने ‘भारत के वीर’  अभियानासाठी १.५ कोटी दान केले

0
53

ही रक्कम हुतात्मा भारतीय जवानांच्या कुटुंबांच्या मदतीसाठी वापरली जाणार आहे.

मुंबई : इनर व्हील डिस्ट्रिक्ट ३१४ या महिलांच्या स्वयंसेवी संघटनेने ‘भारत के वीर’ हा फंड-रेजिंग सांगीतिक कार्यक्रम आयोजित करून हुतात्मा भारतीय जवानांना श्रद्धांजली अर्पण केली.  आघाडीचे पार्श्वगायक जावेद अली यांनी एनसीपीएमध्ये भरगच्च भरलेल्या प्रेक्षागृहात श्रोत्यांना आपल्या गीतांनी मंत्रमुग्ध केले. या कार्यक्रमाच्या माध्यमातून २ कोटी जमा करण्यात आले आणि निव्वळ रक्कम १.५ कोटी गृह मंत्रालयाला ‘भारत के वीर’ अभियानासाठी दान करण्यात आले. ‘टायटल स्पॉन्सर’ म्हणून महिंद्रा ग्रुपने या कार्यक्रमाला सक्रिय पाठिंबा दिला.https://sindhudurgsamachar.in/maharashtra-दीनदयाळ-उपाध्याय-रोजगा/

तब्बल ९०० पेक्षा जास्त प्रेक्षकांनी भरगच्च भरलेल्या प्रेक्षागृहात बॉलिवूडचे नामवंत पार्श्वगायक जावेद अली यांनी देशभक्तीपर गीते तसेच सुपरहिट गाणी सादर केली, श्रीवल्लीसारख्या तुफान लोकप्रिय ठरलेल्या गाणी देखील यामध्ये होती. या कार्यक्रमाला अनेक मान्यवर उपस्थित होते. डिस्ट्रिक्ट चेयरमन मिता शेठ, प्रोजेक्ट चेयरमन पीडीसी डॉ. कनक सक्सेना, श्री. पीसी झा पीएमजी डीआयजीपी, श्रीमती झा, इंद्राणी यादव कमांडंट ऑफिसर, महिंद्रा ग्रुपचे सीईओ आणि मॅनेजिंग डायरेक्टर डॉ अनिश शाह, महिंद्रा ग्रुपच्या चीफ कस्टमर अँड ब्रँड ऑफिसर श्रीमती आशा खारगा, हरीश अँड बिना फाऊंडेशनचे श्री. विल्सन डिसूजा तसेच इनर व्हील डिस्ट्रिक्ट ३१४ चे पदाधिकारी व सदस्य यांचा देखील यामध्ये समावेश होता.   

भारतातील सर्वात मोठी महिला सेवा संघटना, इनर व्हील जगभरात १०० देशांमध्ये पसरलेली आहे.  डिस्ट्रिक्ट ३१४ मध्ये मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यातील ३६०० पेक्षा जास्त महिलांचा समावेश आहे.  भारताच्या वीर जवानांना आदरांजली वाहून त्यांच्या कुटुंबियांना मदत करण्यासाठी एक प्रयत्न म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमातून उभारण्यात आलेली रक्कम गृह मंत्रालयाच्या ‘भारत के वीर’ अभियानासाठी दान करण्यात येईल. यामध्ये वरिष्ठ भारतीय अधिकाऱ्यांची एक समिती या संपूर्ण जमा रकमेचे व्यवस्थापन करते. देशासाठी हौतात्म्य पत्करलेल्या वीर जवानांच्या कुटुंबियांना गरज भासेल त्याप्रमाणे हे फंड्स वितरित केले जातील.

महिंद्रा ग्रुपच्या चीफ कस्टमर आणि ब्रँड ऑफिसर श्रीमती आशा खारगा यांनी सांगितले, देशासाठी आपल्या प्राणांचे बलिदान ज्यांनी दिले अशा वीर भारतीय जवानांच्या कुटुंबियांच्या मदतीसाठी चालवल्या जाणाऱ्या या उपक्रमाला पाठिंबा देताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. महिला सबलीकरणासाठी इनर व्हील आणि मिता शेठ यांनी लक्षणीय कामगिरी बजावली आहे. महिंद्रामध्ये आमचा महिलांच्या सामूहिक शक्तीवर ठाम विश्वास आहे. महिला एकत्र येऊन किती उत्तम कामगिरी बजावू शकतात याचे एक चांगले उदाहरण म्हणजे इनर व्हील. मी सदिच्छा व्यक्त करते की, या वाटचालीत त्यांना यश मिळत राहो.”

इनर व्हील डिस्ट्रिक्ट ३१४च्या डिस्ट्रिक्ट चेयरमन श्रीमती मिता शेठ म्हणाल्या, “भारताला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने संपूर्ण देशभरात आझादी का अमृत महोत्सव‘ साजरा केला जात आहेअशावेळी आम्ही या कल्याणकारी उपक्रमामध्ये योगदान देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. हुतात्मा वीर जवानांच्या कुटुंबियांना मदत करण्याचा हा आमचा प्रयत्न आहे जेणेकरून त्यांना त्यांचे आयुष्य सन्मानपूर्वक जगता येऊ शकेल.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here