मुंबई, २६ डिसेंबर,२०२२: एल अँड टी कन्स्ट्रकशनस्च्या जल व सांडपाणी प्रक्रिया व्यवसायाला चेन्नई बंगळूर इंडस्ट्रीयल कॉरिडॉर (सी बी आय सी) अंतर्गत तुमाकुरू इंडस्ट्रीयल टाऊनशिप लिमिटेड (टी आय टी एल) कडून एक महत्त्वपूर्ण कंत्राट आणि तामिळनाडू शासनाचे अशियायी विकास बँकेकडून (ए डी बी) अर्थसहाय्य असलेल्या तामिळनाडू पाणी पुरवठा व ड्रेनेज बोर्ड (टी डब्ल्यू ए डी बोर्ड) कडून कंत्राट मिळाले आहे.
टी आय टी एल कडून मिळालेल्या कंत्राटात कर्नाटकातील तुमाकुरू नोड येथे इ पी सी (इंजिनिअरिंग, प्रोक्यूअरमेंट, कन्स्ट्रकशन) आधारावर पायाभूत सुविधांची रचना, बांधकाम, चाचणी, कमिशन, ऑपरेशन्स आणि देखभाल ही कामे अंतर्भूत आहेत. या कामात ३८ किमी च्या रस्त्याची संरचना व बांधकाम करणे आणि त्याच बरोबर पावसाच्या पाण्याचा निचरा आणि सिंचन, क्रॉस ड्रेनेज स्ट्रक्चर, पिण्यायोग्य आणि पुनर्नवीनिकरण केलेल्या पाण्याचा पुरवठा करणारी यंत्रणा, नाले व गटारांमधील सांडपाणी संचय प्रणाली, रस्त्यांच्या बाजूचे दिवे व ऊर्जा वितरण प्रणाली, ७ एम एल डी जल प्रक्रिया व शुद्धीकरण प्लांटस् , ३ एम एल डी नाले व गटार सांडपाणी प्रक्रिया प्लांटस्, २.५ एम एल डी सामान्य सांडपाणी प्रक्रिया प्लांटस्, सर्विस जलाशय आणि इंटीग्रेटेड कमांड आणि कंट्रोल सेंटर (आय सी सी सी ) बिल्डिंग यांचे ४ वर्षांच्या कालावधीसाठी संपूर्ण ऑपरेशन्स आणि देखभाल यांचा समावेश आहे.
हा प्रकल्प संपूर्ण देशभरातली सर्व औद्योगिक कॉरिडॉर च्या सर्वसमावेशक विकासावर देखरेख करणारी सर्वोच्च संस्था ‘राष्ट्रीय औद्योगिक कॉरिडॉर डेवलपमेंट अँड इम्प्लिमेनटेशन ट्रस्ट (NICDIT एन आय सी डी आय टी) अंतर्गत भारत सरकारच्या’ औद्योगिक गलिआरे विकास कार्यक्रम’ (डेवलपमेंट ऑफ इंडस्ट्रीयल कॉरिडॉर) या प्रमुख कार्यक्रमाचा भाग आहे. उद्योग क्षेत्र, निवासी क्षेत्र, व्यावसायिक संकुल, लॉजिस्टिक्स हब इत्यादींना चालना देण्यासाठी एकूण १७५० एकर क्षेत्रातील जमिनीला विकसित करण्याची ही योजना आहे. यात तुमाकुरू येथील ८० एकर क्षेत्राच्या ग्रीन कव्हर विकासाचा ही समावेश आहे.
याशिवाय, टी डब्ल्यू. ए डी बोर्ड कडून मिळालेल्या कंत्राटात कोईम्बतूर येथे ‘जमिनीच्या आतील मलनिस्सारण योजना (यू जी एस एस) चे काम अंतर्भूत आहे. या कामामध्ये वडवल्ली, वीरकेरलम, कवुंडमपालयम आणि तुडीयालूर या भागात घर सेवा कनेक्शन, सीवरेज नेटवर्क, पंपिंग, रोड रीस्टोरेशन, लिफ्ट स्टेशन यांची अंमलबजावणी समाविष्ट आहे. ही काम पूर्ण झाल्यावर सुमारे ३ लाख लोकांना याचा फायदा मिळेल.
एल अँड टी कोईम्बतूर मध्ये असाच एक यू जी एस एस प्रकल्प राबवित आहे. हे कंत्राट एल अँड टी ला पुन्हा मिळणे हे ग्राहकांचा एल अँड टी च्या क्षमतांवर असलेला मजबूत विश्वास दाखवते.