मुबंई– दरवर्षी दिवाळीच्या काळात एसटी प्रवास भाड्यात होणारी वाढ आजपासून लागू झाली आहे. आजपासून एसटी प्रवासामध्ये 5 रुपये तर 75 रुपयांची वाढ झाली असून ही भाडेवाढ 31 ऑक्टोबर पर्यंत लागू असणार आहे. एसटी महामंडळाकडून दिवाळीच्या काळात महसूल वाढीसाठी दरवर्षी अशी वाढ लागू करण्यात येते. https://sindhudurgsamachar.in/maharashtra-आरोग्य-विभागात-१०-हजार-प/
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर एस.टी. महामंडळाने केलेली हंगामी भाडेवाढ मध्यरात्रीपासून लागू झालेली आहे. त्यामुळे ऐन दिवाळीत बाहेर गावी जाणाऱ्या प्रवाशांना आर्थिक झळ सोसावी लागणार आहे. ही दरवाढ साधी (परिवर्तन), निमआराम (हिरकणी), शिवशाही (आसन) आणि एसी बसेसला लागू राहील. शिवनेरी आणि अश्वमेध या बसेसला ही भाडेवाड लागू राहणार नाही.https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-आकाशकंदिल-घेत-आहेत-


