Maharashtra: जावा येझ्दी मोटरसायकलतर्फे २०२३ ची दमदार सुरुवात, जावा 42 आणि येझ्दी रोडस्टरला मिळणार नवे रंग

0
56

 येझ्दी रोडस्टरला मिळणार नवा क्रिमसन ड्युएल टोन लूक

●        जावा 42 स्पोर्ट्स स्ट्राइप नव्या कॉस्मिक कार्बन शेडमध्ये उपलब्ध होणार

पुणे – नव्या वर्षाची रंगतदार सुरुवात करण्यासाठी जावा येझ्दी मोटरसायकल्सने त्यांच्या जावा 42 स्पोर्ट्स स्ट्राइप आणि येझ्दी रोडस्टर या सर्वाधिक विक्रीच्या दोन मोटरसायकल्स नव्या रंगांत उपलब्ध केल्या आहेत. जावा 42 स्पोर्ट्स स्ट्राइपला मेटॅलिक कॉस्मिक कार्बन रंग देण्यात आला आहेतर येझ्दी रोडस्टर श्रेणीला आकर्षक ग्लॉस फिनिशमध्ये क्रिमसन ड्युएल टोन देण्यात आला आहे. http://sindhudurgsamachar.in/maharashtra-इनर-व्हील-डिस्ट्रिक्टन/

जावा 42 स्पोर्ट्स स्ट्राइपचा कॉस्मिक कार्बन रंग आयुष्यापासून प्रेरणा घेणारा आहे. त्याचे कार्बन फायबर फिनिश स्पोर्ट्स स्ट्राइप निसर्गाला सलाम करणारे आहे. कार्बनच्या साधेपणात लपलेल्या गुंतागुंतीचे प्रतीक असलेले हे फिनिश गाडीची ताकद तसेच चपळाई दाखवते. येझ्दी रोडस्टर क्रिमसन ड्युएल टोन या मॉडेलच्या राकटपणाला वेगळाच पैलू देते. हे नाहीतर ते अशी सतत एकाच गोष्टीची निवड न करायला आवडणाऱ्यांसाठी हे ड्युएल टोन फिनिश योग्य आहे.

जावा 42 कॉस्मिक कार्बनची किंमत १,९५,१४२ रुपये आहेतर येझ्दी रोडस्टर क्रिमसन ड्युएल टोनची किंमत २,०३,८२९ रुपये असून दोन्ही किंमती एक्स शोरूम दिल्ली आहेत.

जावा येझ्दी परिवारात दोन नवी मॉडेल्स समाविष्ट करताना जावा येझ्दी मोटरसायकल्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष सिंग जोशी म्हणासे, ‘दोन नवे रंग जावा आणि येझ्दी ब्रँड्सचा नवा काळ घेऊन येतील. हे आर्थिक वर्ष आकर्षक टप्प्यांनी परिपूर्ण होते व त्यामध्ये भारतीय बाजारपेठेत येझ्दीची नवी श्रेणी लाँच करण्यात आली. त्याशिवाय या वर्षात ब्रँडने अतिशय वेगाने वितरकांचे जाळे विस्तारले आणि मोटरसायकल्स राइड्समधून विविध भौगोलिक प्रदेशांवर असलेली तिची पकड दाखवून दिली. ही तर केवळ सुरुवात आहे आणि येत्या वर्षात आम्ही जावा व येझ्दी उत्पादन श्रेणीत नव्या वैशिष्ट्यांचा समावेश करण्यासाठी उत्सुक आहोत.’

दोन्ही मोटरसायकल्समध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाने युक्त इंजिन्स बसवण्यात आली आहेत, जी दमदार कामगिरी करतात. येझ्दी रोडस्टरला ३३४ सीसी क्षमतेचे लिक्विड कुल्ड, फ्युएल इंजेक्टेड, डीओएचसी सिंगल सिलेंडर इंजिन बसवण्यात आले आहे, जे २९.७ पीएसची सर्वोच्च ताकद आणि २८.९५ एनएमचा सर्वोच्च टॉर्क देते. जावा 42, 2.1 मध्ये २९४.७२ सीसी इंजिन त्याच समीकरणासह देण्यात आले आहे, जे २७.३२ पीएसची ताकद आणि २६.८४ एनएमचा सर्वोच्च टॉर्क देते. दोन्ही मोटरसायकल्समध्ये सहज शिफ्ट होणारे सिक्स स्पीड ट्रान्समिशन देण्यात आले आहे, तर येझ्दी रोडस्टरमध्ये ए अँड एस क्लच देण्यात आला आहे. हाताळणी व आरामदायीपणा देणारे चासिसचे प्रीसिजन, काँटिनेंटलचे ड्युएल चॅनेल एबीएस हे दर्जेदार ब्रेक्स यांमुळे दोन्ही मोटरसायकल्स दररोज उत्तम कामगिरी करण्यासाठी सक्षम झाल्या आहेत.

नेटवर्क विस्तारण्यास जावा येझ्दी मोटरसायकल्सचे प्राधान्य असून वेगाने आपल्या ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी कंपनी आपले अस्तित्व वाढवत आहे. सध्या कंपनीची देशभरात ४०० आउटलेट्स असून या कॅलेंडर वर्षापर्यंत ही संख्या ५०० पर्यंत नेण्याचे उद्दिष्ट आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here