Maharashtra: “टाटा मुंबई मॅरेथॉन” च्या इतिहासात प्रथमच गावोगावच्या महिला सरपंचही धावणार !

2
187
Maharashtra:

मुंबई- राज्यातील विविध जिल्ह्यांतील महिला सरपंच व अन्य गाव कारभारणी 15 जानेवारी 2023 रोजी होणाऱ्या टाटा मुंबई मॅरेथॉनमध्ये सहभागी होणार आहेत. पंचायतींमधील महिला नेतृत्व देशाच्या आर्थिक राजधानीत आणि राज्याच्या राजधानीत गाव खेड्याच्या विकासाचे स्वप्न घेऊन धावणार आहेत. मुंबई मॅरेथॉनच्या दृष्टीने ही अद्‌भूत “ड्रीम रन” ठरणार आहे. गाव विकास प्रशिक्षण आणि महिला नेतृत्वाला प्रोत्साहन देण्यासाठी झटणारी आरएससीडी आणि पायाभूत लोकशाही सक्षमीकरणासाठी (Grassroots Democracy Platform) प्रयत्न करणारी “ईशाद“(ISHAD) या स्वयंसेवी संस्थांच्या प्रोत्साहनातून महिला सरपंचांचे हे स्वप्न साकार होणार आहे. https://sindhudurgsamachar.in/maharashtra-ज्येष्ठ-नागरिकांना-मोफ/

गावांच्या विकासात आता महिला नेतृत्वही आपल्या परिने मोलाचे योगदान देत आहे. ग्रामपंचायतींच्या कारभाराचा डोलारा ते आता यशस्वीरीत्या आपल्या खांद्यावर घेऊ लागल्या आहेत. स्थानिक विकासकामे, गरजा व निधीचा पारदर्शी उपयोग, या सर्व कामांमध्ये त्यांचे नैपुण्य दिसू लागले आहे. सुशासनाद्वारे महिला व गावाच्या सर्वांगीण विकासावर त्यांचा भर आहे. सावित्रीच्या या लेकींनी ठिकठिकाणी आपले कर्तृत्व सिद्ध करून दाखविले आहे.

महाराष्ट्रात 73 व्या घटनादुरुस्तीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींबरोबरच महिलांना 50 टक्के आरक्षण उपलब्ध करून देण्यात आले आहे. नावीन्यपूर्ण उपक्रमांचा स्वीकार करण्यात किंवा त्या आत्मसात करण्यात महिला नेहमीच तत्परता दाखवितात. त्यांना फक्त प्रोत्साहनाची गरज असते. ते काम आरएससीडी आणि ईशादच्या माध्यमातून गेली अनेक वर्षांपासून केले जात आहे.

टाटा मुंबई मॅरेथॉनमध्ये एकूण 20 पंच सरपंच व नेतृत्वशील महिला धावणार आहेत. त्यांची नावे अशी: सीमा पाचंगे, वर्षा मिडगुले ,प्रणया टेमकर, अर्जना पवार,शारदा गायधने , ऊमा माळी, अर्चना कांबळे,शर्मिला रामटेके,संगिता वेंदे ,अर्चना जतकर,रत्नमाला वैद्य, हर्षदा वाळके,मालती सगणे, सुनंदा मांदळे, सुरैय्या पठाण, नंदा गायकवाड, माया सोनागोती, समिना शेख, प्रज्ञा आवाडे आणि मयुरी लाड.

काही नेतृत्वशील महिलांचा अल्प परिचय:

  • श्रीमती मालती सगणे चंद्रपूर तालुक्यातील 10 गावांमध्ये श्रीमती सगणे यांच्या पुढाकाराने बचतगट स्थापन करण्यात आले. त्यातून त्यांचे नेतृत्व पुढे आले. गेली 22 वर्षे त्या महिला सक्षमीकरण आणि गाव विकासासाठी झटत आहेत. पंचायतराज या विषयात त्या तज्ज्ञ असून, नवनियुक्त लोकप्रतिनिधींना त्या प्रशिक्षणही देतात. विविध समित्यांवरही त्या कार्यरत आहेत. त्यांना उत्तम जिल्हा संघटिका आणि उत्कृष्ट सामाजिक कार्यकर्त्या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
  • श्रीमती रत्नमाला वैद्य महिला सक्षमीकरण आणि महिलां हिंसेला प्रतिबंध करण्यासाठी गेल्या अनेक वर्षे त्या अग्रेसर भूमिका निभावत आहेत. विविध समित्या आणि मंडळांच्या त्या अध्यक्षा आहेत. त्यांनी 2019 मध्ये लंडन येथे ‘भारतातील महिलांची राजकीय स्थिती’ यावर अभ्यासपूर्ण मांडणी केली होती. लोकसेवक समाजरत्न, सखी गौरव आणि लोकमत सखी गौरव पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.
  • श्रीमती अर्चना जतकर संघटन बांधणी, उत्तम संवाद कौशल्य आणि प्रभावी लेखन ही अर्चनाताई जतकर यांच्या व्यक्तिमत्वाची वैशिष्ट्ये आहेत. जीपीडीपी आणि क्रांतिज्योती प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उत्तम प्रशिक्षिका म्हणून त्यांचा परिचय आहे. त्यांना अहिल्याबाई होळकर उत्कृष्ट सरपंच पुरस्कार, कुसुमताई लेले पुरस्कार आणि महिला राजसत्ता आंदोलन उत्कृष्ट सरपंच पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
  • श्रीमती सुनंदा मांदळेएकल व परितक्त्या महिलांना मदतीचा हात देतांना गावाच्या विकासातही योगदान देणारे नेतृत्व म्हणून श्रीमती मांदळे पंचक्रोशीत  परिचित आहेत. पंचायतराज क्षेत्रात गेली अनेक वर्षे प्रशिक्षक म्हणूनही त्यांनी आपली ओळख प्रस्थापित केली आहे. संघटन बांधणी आणि शासकीय यंत्रणेचा गावाच्या उन्नतीसाठी वापर करण्यात त्यांची हातोटी आहे. त्यांना आदर्श कार्यकर्ती पुरस्कार व यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठांचा युवा कार्यकर्ती पुरस्कार बहाल करण्यात आला आहे.
  • श्रीमती नंदा गायकवाड संघटन बांधणी, प्रशिक्षण, कविता लेखन, संवाद, कौशल्य इत्यादींच्या जोरावर श्रीमती गायकवाड यांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे. स्थानिक स्वराज्य संस्था आणि महिला सक्षमीकरणाच्या कार्यासाठी त्यांचा सावित्रीबाई ग्राम मंगल  पुरस्कार, आदर्श सरपंच पुरस्कार व कला संस्कृती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
  • श्रीमती हर्षदा वाळकेएमए- बीएड पर्यंत शिक्षण घेतलेल्या श्रीमती वाळके यांचा गृहिणी ते पंचायत समिती सदस्यपर्यंतचा प्रवास कौतुकास्पद आहे. राष्ट्रीय ग्रामस्वराज्य योजनेंतर्गत पंचायत महिला शक्ती अभियानामध्ये मास्टर ट्रेनर म्हणून त्या कार्यरत आहेत. जीपीडीपी आणि क्रांतिज्योती प्रशिक्षण कार्यक्रमातही त्या मास्टर ट्रेनर म्हणून कार्यरत आहेत.
  • श्रीमती सुरैय्या पठाण प्रभावी संवाद कौशल्य आणि प्रशिक्षण देण्याची उत्कृष्ट हातोटी ही श्रीमती पठाण यांच्या व्यक्तिमत्वाची ठळक वैशिष्ट्ये आहेत. राज्य शासनाच्या विविध प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत त्या प्रशिक्षिका म्हणून जबाबदारी पार पाडत आहेत. सावित्री अकादमीच्या जिल्हा समन्वयक व यशस्विनी सामाजिक अभियानाच्या सदस्या म्हणून त्या आपली भूमिका निभावत आहेत.

मॅरेथॉनमध्ये धावणाऱ्या या महिला सरपंचांचा अनुभव महाराष्ट्रातील अन्य महिला सरपंच व ग्रामपंचायत महिला सदस्यांसाठी प्रेरणादायी असेल. लोकशाही सक्षम करण्याच्या (Grassroots Democracy) दृष्टीने राज्याचे निवृत्त मुख्य सचिव व माजी राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांचे या कामी महत्त्वपूर्ण मार्गदर्शन लाभत आहे. एकूणच या मॅरेथॉनच्या माध्यमातून या महिला सरपंच संपन्न अशा अनुभवाची शिदोरी आपापल्या गावांत घेऊन जातील.

2 COMMENTS

  1. […] मुंबई :  क्रिकेट प्रशिक्षक हेमू दळवी यांचे आज सकाळी  ११ वाजता प्रदीर्घ आजाराने निधन झाले. मृत्यूसमयी ते ८४ वर्षाचे होते. गेले सहा महिने त्यांना दिवसातून तीन वेळा डायालीसीस करावे लागत होते. दहिसर येथे आपल्या मुली कडे ते राहात होते. संध्याकाळी दहिसर पश्चिम येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी, मुलगी आणि जावई असा परिवार आहे. त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी त्यांचे झुनझुनवाला महाविद्यालयातील त्यांचे  शिष्य बलविंदर सिंग संधू, रवी ठाकर, मृदुल चतुर्वेदी, अरविंद धुरी, प्रमोद साटम राजू शिर्के अशी क्रिकेटर मंडळी उपस्थित होती.http://sindhudurgsamachar.in/maharashtra-टाटा-मुंबई-मॅरेथॉन-च्/ […]

  2. […] वेंगुर्ले- रस्ता सुरक्षा सप्ताह कार्यक्रमा अंतर्गत निवती पोलीस ठाणे निवती ,पोलिस ठाणे हद्दीत जनजागृती मोहीम राबविण्यात आली. यात पाट, म्हापण बाजारपेठ व केळूस येथील रिक्षाचालक तसेच वाहन चालक यांना वाहतूकीच्या नियमांचे पालन तसेच अापतकालीन संकटावेळी करावयाची अपघातग्रस्तांना मदतकार्य या बद्दल माहिती देण्यात आली. http://sindhudurgsamachar.in/maharashtra-टाटा-मुंबई-मॅरेथॉन-च्/ […]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here