Maharashtra: नवी मुंबईत ट्रक चालक आंदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक व हल्ला करण्याचा प्रयत्न

0
84
ट्रक चालक आंदोलक,
नवी मुंबईत ट्रक चालक आंदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक व हल्ला करण्याचा प्रयत्न

मुबंई- सरकारने मंजूर केलेल्या कायद्याविरोधात ट्रक चालकांनी नवी मुंबईत आंदोलन केलं. परंतु या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याचं दिसून येत आहे. त्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. केंद्र सरकारविरोधात देशभर ट्रक चालकांचं आंदोलन सुरु आहे. नवी मुंबईतल्या जेएनपीटी मार्गावर आंदोलनाला हिंसक वळण लागलं होतं. ट्रक आणि डंपर चालकांनी रस्त्यावर वाहनं उभी केल्याने पोलिसांनी त्यांना रस्ता रिकामा करण्यास सांगितलं. https://sindhudurgsamachar.in/देश-विदेश-अरबी-समुद्रात-व/

यावेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली.काही आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केली तर काहीजण बांबू घेऊन पोलिसांच्या मागे लागले. यावेळी पोलिसांनी तिथून काढता पाय घेतला. याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. घटनेमध्ये काही पोलिस किरकोळ जखमी झाले आहेत. याप्रकरणी आंदोलकांवर कायदेशीर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती मिळत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here