Maharashtra: पंढरपूरच्या विठुरायाच्या चरणी एका भाविकाने केले तब्बल दोन कोटी रुपयांचे सोन्याचे दागिने अर्पण

2
133
पंढरपूरच्या विठुरायाच्या चरणी एका भाविकाने केले तब्बल दोन कोटी रुपयांचे सोन्याचे दागिने अर्पण

पंढरपुर– आज विठुराया आणि रुक्मिणी मातेच्या विवाह सोहळा पंढरपुरात पार पडत आहे. पंढरपूरच्या विठुरायाच्या चरणी एका भाविकाने तब्बल दोन कोटी रुपयांचे सोन्याचे दागिने अर्पण केले आहेत. मंदिर समितीच्या इतिहासातील सर्वात मोठे दान असल्याचे मानले जाते‌.

या दानामध्ये विठ्ठल आणि रुक्मिणीला सोन्याचे मुकुट, विठ्ठल आणि रुक्मिणी मातेला मोहोन माळ, रुक्मिणी मातेला कोल्हापुरी साज, पाटल्या, बांगड्या, मंगळसूत्र, जोडवी असे सोन्याचे दागिने दिले आहेत. याशिवाय देवाच्या नित्योपचारासाठी चांदीचे मोठे ताट, वाटी, समई, तांब्या, भांडी, ताम्हण, पळी आणि देवाचा चांदीचा आरसा आहे.

मंदिर समितीच्या इतिहासामध्ये सर्वात मोठे दान असल्याचे मानले जाते‌.विठ्ठल मंदिरात आज दुपारी बारा वाजता विठ्ठल आणि रुक्मिणीचा विवाह सोहळा मोठ्या थाटामाटात संपन्न होणार आहे. या निमित्त पंढरपुरात जय्यत तयारी सुरु आहे.बंगळूरू इथल्या एका भाविकाने विठ्ठल रुक्मिणी यांच्या विवाह सोहळ्याच्या निमित्ताने पोषाख भेट दिला आहे

2 COMMENTS

  1. […] आंबोली – मानद वन्यजीव रक्षक महादेव भिसे यांनी दूरध्वनी वरुन आंबोली वनपरिक्षेत्रांचे वनअधिकारी व वनकर्मचारी,वन विभाग यांना नानापाणी रस्त्यांच्या बाजुला आठ ते दहा दिवसाचे माकडाचे पिल्लू असल्याचे दूरध्वनी वरुन कळविले. वन विभागाने तातडीने माकडाच्या पिल्लूला वन कार्यालयात आणले. त्याच्यावर प्राथमिक उपचार केले आणि त्याला दूधही पाजले. http://sindhudurgsamachar.in/maharashtra-पंढरपूरच्या-विठुराया… […]

  2. […] कोल्हापुर: भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 73 व्या वर्धापन दिनानिमित्त स्टेट बँक ऑफ इंडिया रंकाळा शाखा येथे झेंडावंदन करण्यात आले. झेंडावंदन सोहळ्यात कोल्हापुरातील कान, नाक घश्याचे प्रसिद्ध डॉक्टर शिरीष कुलकर्णी यांनी राष्ट्रीय ध्वज फडकवून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. ध्वजवंदनाला बँकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.यावेळी प्रजासत्ताक दिनानिमित्त बँकेच्या अधिकाऱ्यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या.http://sindhudurgsamachar.in/maharashtra-पंढरपूरच्या-विठुराया… […]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here