मुंबई – ११ जानेवारी – पिरामल कॅपिटल आणि हाउसिंग फायनान्स लिमिटेड म्हणजेच पिरामल फायनान्स या पिरामल एंटरप्राइजेसच्या (पीईएल) संपूर्ण मालकीच्या उपकंपनीने आज देशातील कर्जापासून वंचित आणि दुर्लक्षित असलेल्या समाजाच्या गरजा पूर्ण करणारे पहिले ब्रँड कॅम्पेन लाँच केले. ‘हम कागज से ज्यादा नियत देखते है’ असे शीर्षक असलेले हे कॅम्पेने कागदपत्रांच्या पलीकडे जात कर्ज हवे असणाऱ्या ग्राहकांची पत जाणून घेणार आहे. https://sindhudurgsamachar.in/maharashtra-राज्यस्तरीय-आंतरशालेय/
हे कॅम्पेन पिरामल फायनान्सच्या ग्राहकाभिमुखतेवर भर देणार आहे तसेच बजेटबाबत सजग असणाऱ्या आणि देशभरातील दुसऱ्या व तिसऱ्या श्रेणीच्या शहरांतील मध्यम व लघु व्यवसायांपर्यंत पोहोचण्याचे ध्येय या कॅम्पेनने ठेवले आहे. कॅम्पेनची सुरुवात दोन जाहिरातींनी करण्यात येणार असून त्यात पिरामल ब्रँड कशाप्रकारे ग्राहकांची केवळ कागदपत्रे न तपासता त्यांची सचोटी जाणून घेणार असल्याचे पाहायला मिळेल. https://sindhudurgsamachar.in/21-गन-सॅल्यूट-इंटरनॅशनल-कॉन/
वॉम्बची संकल्पना असलेल्या या फिल्ममध्ये दोन कुटुंबांचे आयुष्य दाखवण्यात आले आहे, ज्यांना कर्ज मिळवण्यात अडचणी येत असतात. पिरामल फायनान्स कशाप्रकारे अशा व्यक्ती व त्यांच्या कुटुंबाच्या पाठीशी उभे राहाते हे या जाहिरातीत दाखवण्यात आले आहे. गृह कर्ज, व्यवसाय कर्ज आणि वैयक्तिक कर्ज, युज्ड कारसाठीचे कर्ज अशा प्रकारच्या खास तयार करण्यात आलेल्या उत्पादनांच्या मदतीने पिरामल फायनान्स ग्राहकांना केवळ त्यांचा कर्ज इतिहास आणि कागदपत्रे तपासून कर्ज देणार नाही, तर ग्राहकांचे त्यांचा हेतू व सचोटीच्या आधारे विश्लेषण केले जाणार आहे. कर्ज घेणाऱ्यांसाठी हा निश्चितच बाकीच्यांपेक्षा वेगळा अनुभव ठरणार आहे.
पिरामल कॅपिटल आणि हाउसिंग फायनान्स लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक जयराम श्रीधरन म्हणाले, ‘भारताच्या कानाकोपऱ्यात विस्तार करत असताना आम्ही एरवी आर्थिक यंत्रणेद्वारे दुर्लक्ष केल्या जाणाऱ्या मोठ्या ग्राहकवर्गापर्यंत पोहोण्यासाठी प्रभावी व अनोख्या कर्ज सुविधांवर भर देणार आहोत. या कॅम्पेनच्या माध्यमातून तसेच रिब्रँडिंगच्या मदतीने नवी, दमदार, ग्राहकाभिमुख कर्ज व्यवसाय फ्रँचाईझी तयार करण्यावर आम्ही लक्ष केंद्रित करणार आहोत. भारतासारख्या गुंतागुंतीची समाज यंत्रणा असलेल्या देशाला सोप्या, प्रभावी आणि परिणामकारक कर्ज सुविधांची तसेच ग्राहकांच्या आर्थिक गरजांची सखोल जाण असलेल्या यंत्रणेची गरज आहे.’
या कॅम्पेनविषयी पिरामल कॅपिटल आणि हाउसिंग फायनान्स लिमिटेडचे प्रमुख अरविंद अय्यर म्हणाले, ‘आपल्या देशात विविध कारणांमुळे कर्जास पात्र न समजले जाणारे बरेच वंचित व दुर्लक्षित नागरिक आहे आणि त्यांना कर्ज मिळण्याची प्रक्रिया सुरू करण्याआधीच विविध आव्हानांना तोंड द्यावे लागते. पिरामल फायनान्समध्ये आम्ही अशा ग्राहकांच्या कर्जविषयक गरजा पूर्ण करण्यासाठी व त्यांच्या आर्थिक महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी मदत व्हावी म्हणून नाविन्यपूर्ण व लवचिक सुविधा तयार करण्याचे ध्येय ठेवले आहे.’
आमच्यासाठी आमचे ग्राहक अतिशय महत्त्वाचे आहेत आणि त्यांच्यासाठी ‘हम कागज से ज्यादा नियत देखते है’ हे कॅम्पेन लाँच करताना आनंद होत आहे. हे कॅम्पेन ग्राहकांना ठाम व सकारात्मक संदेश देणारे आहे, की कर्जाची परतफेड करण्याचा योग्य हेतू बाळगणाऱ्यांना पिरामल फायनान्सकडून कर्ज सुविधेचा लाभ घेता येऊ शकेल. हे कॅम्पेन आमच्या पिरामल फायनान्स या एनबीएफसी- एचएफसी या ग्राहकाभिमुख ब्रँडचा आरंभ आहे. वित्त पुरवठ्याचे सुलभ पर्याय उपलब्ध करून त्यांच्यामध्ये सकारात्मकता तयार केली जाणार आहे.