Maharashtra: मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याअंतर्गत 23 ते 25 जानेवारी या कालावधीत ग्रंथ प्रदर्शन आयोजित

0
28
Maharashtra: मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याअंतर्गत 23 ते 25 जानेवारी या कालावधीत ग्रंथ प्रदर्शन आयोजित

मुंबई- मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याअंतर्गत 23 ते 25 जानेवारी या कालावधीत ग्रंथ प्रदर्शन आयोजित करण्यात येणार आहे. मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत मराठी भाषा विभागाचे मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते या ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन होणार असल्याचे मराठी भाषा विभागामार्फत कळविण्यात आले आहे. http://sindhudurgsamachar.in/maharashtra-हिंदूहृदयसम्राट-बाळा/

ग्रंथप्रदर्शनासाठी शासकीय प्रकाशनाबरोबरच खासगी प्रकाशकांनाही सहभागी करुन घेण्यात येणार आहे. त्यासोबतच ग्रंथप्रदर्शनादरम्यान मंत्रालयात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात सकाळी 11 वाजता मंत्रालयात मराठी भाषेसाठी काम करणाऱ्या/ मराठी भाषेत लिखाण करणाऱ्या पाच अधिकारी/ कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. यानंतर ‘चालता बोलता – प्रश्न सरिता’ या कार्यक्रमात सकाळी 11 वा. महाविद्यालयीन विद्यार्थी आणि स्पर्धक मंत्रालयीन अधिकारी/कर्मचारी यांना सहभागी होता येणार आहे.

मंत्रालय येथे ‘अभिवाचन स्पर्धा “24 जानेवारी 2023 रोजी दुपारी 2 वा. परिषद सभागृह, 6 वा मजला, ’ होणार असून त्यात मंत्रालयीन अधिकारी,कर्मचारी सहभागी होतील.दिनांक 25 जानेवारी 2023 रोजी दुपारी 4 वा. ‘हास्यसंजीवनी’ हा कार्यक्रम असणार आहे. अभिवाचन स्पर्धेचा बक्षिस समारंभ व समारोपाचा कार्यक्रम सायं. 5.30 वा. मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात मराठी भाषा विभागाचे प्रधान सचिव यांच्या उपस्थित होईल, असे मराठी भाषा विभागाने कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here