Maharashtra: महाराष्ट्राच्या राज्यपाल पदावरुन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी निवृत्त

0
103
भगत सिंह कोश्यारी

मुंबई: महाराष्ट्राच्या राज्यपाल पदावरुन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी निवृत्त झाले. राजभवनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांतर्फे राज्यपाल भगत सिंह यांना गुरुवारी (दि. १६) राजभवन येथे भावपूर्ण निरोप देण्यात आला.https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-जिल्ह्यातील-ग्रामपंचा/

यावेळी राज्यपालांचे प्रधान सचिव संतोष कुमार, राकेश नैथानी, सहसचिव श्वेता सिंघल व प्राची जांभेकर तसेच इतर कर्मचाऱ्यांनी आपल्या भाषणातून राज्यपालांच्या कार्याचा गौरव केला. 

राज्यपालांचे विशेष सचिव राकेश नैथानी यांना देखील निरोप देण्यात आला.शुक्रवार दिनांक १७ फेब्रुवारी रोजी राज्यपाल कोश्यारी यांना नौदलातर्फे मानवंदना देण्यात येणार असून त्यानंतर ते देहरादूनकडे प्रस्थान करणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here