Maharashtra: महावितरणच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेचे जळगावात आयोजन

0
82
महावितरणच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेचे जळगावात आयोजन

विविध क्रीडा प्रकारात एक हजारांहून अधिक कर्मचारी सहभागी होणार

जळगाव : महावितरणच्या राज्यस्तरीय आंतरपरिमंडलीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन 2 ते 5 फेब्रुवारी 2023 दरम्यान जळगाव येथे करण्यात आले आहे. या स्पर्धेत महावितरणच्या सर्व 16 परिमंडलांतील 1 हजार 83 अभियंते, अधिकारी आणि कर्मचारी सहभागी होणार आहेत. यात 353 महिला तर 730 पुरुष खेळाडूंचा समावेश आहे. https://sindhudurgsamachar.in/ratnagiri-रत्नागिरी-जिल्ह्यातून/

महावितरणमधील कर्मचाऱ्यांच्या क्रीडा कौशल्याला वाव देण्यासाठी आंतरपरिमंडलीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. 2022-23 या वर्षाकरिता या स्पर्धेचे यजमानपद जळगाव परिमंडलाकडे आहे. स्पर्धेचे उद्घाटन गुरुवारी (2 फेब्रुवारी) सकाळी साडेनऊ वाजता जळगाव येथील एकलव्य क्रीडा संकुलात महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय ‍सिंघल यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोकण प्रादे‍शिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक चंद्रकांत डांगे राहणार आहेत. तर प्रमुख पाहुणे म्हणून औरंगाबाद प्रादे‍शिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ.मंगेश गोंदावले,  संचालक (संचालन) संजय ताकसांडे, संचालक (वित्त) रवींद्र सावंत, संचालक (प्रकल्प/मानव संसाधन) प्रसाद रेशमे, प्र. संचालक (वाणिज्य) तथा कार्यकारी संचालक (देयके व महसूल) योगेश गडकरी, कार्यकारी संचालक (संचालन/मानव संसाधन) अरविंद भादीकर, कार्यकारी संचालक (सुरक्षा व अंमलबजावणी) प्रमोद शेवाळे, कार्यकारी संचालक (‍वित्त व लेखा) स्वाती व्यवहारे, प्रादे‍शिक संचालक (नागपूर) सुहास रंगारी, प्रादे‍शिक संचालक (पुणे) अंकुश नाळे उपस्थित राहणार आहेत.

या  स्पर्धेचा  समारोप व पारितोषिक वितरण रविवारी (5 फेब्रुवारी) दुपारी 4 वाजता एकलव्य क्रीडा संकुलावरच कोकण प्रादे‍शिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक चंद्रकांत डांगे यांच्या शुभहस्ते होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संचालक (संचालन) संजय ताकसांडे राहणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून औरंगाबाद प्रादे‍शिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ.मंगेश गोंदावले, संचालक (वित्त) रवींद्र सावंत, संचालक (प्रकल्प/मानव संसाधन) प्रसाद रेशमे, प्र. संचालक (वाणिज्य) तथा कार्यकारी संचालक (देयके व महसूल) योगेश गडकरी, कार्यकारी संचालक (संचालन/मानव संसाधन) अरविंद भादीकर, कार्यकारी संचालक (सुरक्षा व अंमलबजावणी) प्रमोद शेवाळे, कार्यकारी संचालक (‍वित्त व लेखा) स्वाती व्यवहारे, प्रादे‍शिक संचालक (नागपूर) सुहास रंगारी, प्रादे‍शिक संचालक (पुणे) अंकुश नाळे, स्पर्धेचे मुख्य समन्व्यक तथा मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी संजय ढोके इत्यादी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.

स्पर्धेत खो-खो, ॲथलेटिक्स, क्रिकेट, बॅडमिंटन, टेबल टेनिस, टेनिक्वाईट, कॅरम, कबड्डी, व्हॉलीबॉल, कुस्ती, बुद्धिबळ आणि ब्रिज या खेळांचा समावेश आहे. वैयक्तिक, सांघिक आणि सर्वसाधारण या तिन्ही  प्रकारात विजेत्यांना पारितोषिके दिली जाणार आहेत.  जळगाव ‍ परिमंडलाचे मुख्य अभियंता कैलास हुमणे यांच्या अध्यक्षतेखाली विविध समित्यांचे गठण करण्यात आले असून स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी त्यांच्या मार्गदर्शनाखाली अधीक्षक अभियंते, कार्यकारी अभियंते, अधिकारी, कर्मचारी आणि आयोजन समितीचे सचिव तथा जळगाव परिमंडलाचे उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी अरुण शेलकर परिश्रम घेत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here