Maharashtra: महिंद्राने त्यांच्या तीन चाकी इलेक्ट्रिक वाहनांसाठी नेमो  (NEMO) ड्रायव्हर अॅप सुरू केला

1
143

प्रतिनिधी – सतीश कसबे

महिंद्राच्या प्रसिद्ध कनेक्टेड मोबिलिटी इन्फ्रास्ट्रक्चरवर आधारित हे अॅप महिंद्राने कंपनी अंतर्गतच विकसित केले आहे.

·        आता चालकांना त्यांच्या वाहनाचे दुरस्थपणे निरीक्षण करता येईल आणि वाहनांवर नियंत्रण ठेवता येईल. तसेच त्यांना लगेच क्रिया करता येईल अशा पद्धतीने वाहन चालवण्याबाबत सूचना मिळतील आणि लाइव्ह  सुचनांमध्ये अतिमहत्वाच्या थेट सूचना सुद्धा प्राप्त होतील. याशिवाय आणखी बरेच काही या अॅप द्वारे चालकांना मिळेल.

·        वाहनाचा पर्यावरणावर कसं सकारात्मक परिणाम होत आहे याची माहिती मिळते.

·        हे अॅप एकापेक्षा जास्त इलेक्ट्रिक वाहने अखंडपणे व अचूक व्यवस्थापित करते. शिवायसहलींचे आणि मार्गांचे नियोजन करण्यात मदत करते आणि २४ तास सहायता व मार्गदर्शन पुरविते.

मुंबई : महिंद्रा समूहाचा एक भाग असलेल्या महिंद्रा इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेड ने सर्व चालकांसाठी वैयक्तिक नेमो ड्रायव्हर अॅप्लिकेशन चालू केले आहे. महिंद्राच्या प्रसिद्ध कनेक्टेड मोबिलिटी इन्फ्रास्ट्रक्चर वर आधारित हे अॅप महिंद्राने कंपनी अंतर्गतच इन् हाऊस विकसित केले आहे. रेंज मिळण्याची काळजी यांसारख्या समस्यांवर हे लक्ष देते आणि वाहनाच्या चार्जिंग सायकल चे नियोजन करण्यासही मदत करते आणि यामधून चालकांची कार्यक्षमता वाढविते. हे अॅप इंटरअॅक्टिव्ह असून चालवण्यापासून ते चार्जिंग च्या सूचनांसह महिंद्रा इलेक्ट्रिक तीन चाकी गाड्या (ट्रिओ ऑटो, ट्रिओ जोर, जोर ग्रँड) बाबत लाइव्ह महत्त्वाच्या आकडेवारी पुरविते.https://sindhudurgsamachar.in/maharashtra-औद्योगिक-व-व्यावसायिक-क/

नेमो ड्रायव्हर अॅप्लिकेशन ग्राहकांच्या विस्तृत आणि सविस्तर अभिप्रायांचा अभ्यास करून बनविले आहे. इलेक्ट्रिक दळणवळण अधिक जोडलेले, सोईस्कर, त्रासमुक्त करण्याच्या उद्देशाने कंपनीने हे अॅप विकसित केले आहे. ग्राहक त्यांच्या अँन्ड्रॉईड फोन वर प्ले स्टोर द्वारे सोप्या पद्धतीने हे अॅप विनामूल्य डाउनलोड करू शकतात. एक iOS रोलआउट देखील पुढे भविष्यात नियोजित आहे.

          महिंद्रा इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेड चे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती सुमन मिश्रा या घोषणेसंदर्भात म्हणाल्या, आमच्या चालक मित्रांना त्यांच्या महिंद्रा लास्ट माइल मोबिलिटी इव्ही अगदी सहज सुलभपणे नियंत्रित करण्यास मदत करणारे उपाय प्रदान करताना मला फार आनंद होत आहे. हे नेमो ड्रायव्हर अॅप रीयल टाइम डेटा सह इलेक्ट्रिक वाहन घेणाऱ्यांच्या ड्रायव्हिंग पॅटर्नवर प्रकाश टाकेल आणि पर्यावरणपूरकता व शाश्वतता चा संदेश देत चालकांचा नफा सुद्धा वाढवेल.

११ पेक्षा जास्त अशा मुख्य वैशिष्ठ्यांसह नेमो ड्रायव्हर अॅप कनेक्टेड दळणवळणाच्या अनुभवांचे आधुनिक व प्रगत विस्तारक्षेत्र ग्राहकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्दिष्टासह या इलेक्ट्रिक दळणवळणाच्या आधुनिक युगात मदत करण्यासाठी सज्ज आहे.

नेमो ड्रायव्हर अॅप हे क्लाउड वर आधारित अॅप असून ते नवीन युगातील शहरी इलेक्ट्रिक दळणवळण सुधारण्यासाठी नवीन पिढीच्या शेअर आणि कनेक्ट केलेल्या सेवांच्या विकासास सहाय्यक ठरते.

नेमो ड्रायव्हर अॅप ची ठळक वैशिष्ठ्ये:

·         इन्स्टंट लॉग-इन – नोंदणीकृत मोबाइल क्रमांकाद्वारे अॅप मध्ये सहज प्रवेश मिळविता येतो.

·        बचतीचा मागोवा (ट्रॅक सेविंग्स) – इंधन वापरणारे तीन चाकी वाहनांच्या तुलनेत तुमच्या इव्ही वाहनाने केलेल्या मोठ्या बचतीचा मागोवा हे अॅप ठेवते.

·        स्थिर करून ठेवणारे( इम्मोबिलायझर) – चोरी झाल्यास तुमची इव्ही तुम्ही दूर वरूनच अॅप च्या सहाय्याने स्थिर म्हणजे हलवता येऊ शकणार नाही अशी करू शकता.

·        सुलभ मार्ग प्रदर्शन (ईझि नॅविगेशन) – या अॅप द्वारे सर्वात जलद पोहोचणाऱ्या मार्गाबद्दल सहजपणे सूचना मिळाल्यामुळे चालक अधिक बचत करून जास्त चकरा मारून अधिक नफा मिळवू शकतो.

·        वाहनाच्या स्थितीबद्दल अद्ययावत माहिती (वेहिकल स्टेटस अपडेट)- चार्जिंग किती आहे (स्टेट ऑफ चार्ज), किती अंतरानंतर ते संपेल (डिस्टन्स टू एम्प्टी), चार्जिंग ला लागणारे वेळ (टाइम टू चार्ज) इत्यादी वाहनासंदर्भात अद्ययावत माहिती मिळते.

·        माझे वाहन शोधा (फाइंड माय वेहिकल) – तुमचे वाहन कुठे आहे ते शोधून त्याच्या अचूक स्थानाकडे नेणारा मार्ग हे अॅप दाखविते.

·        सावध करणाऱ्या सूचना (अटेन्शन अलर्टस्) – वाहनाच्या स्थिती बद्दल वेळोवेळी सावध करणाऱ्या सूचना मिळत असल्याने वाहन एकदम बंद पडण्याचा धोका कमी होतो.

·        मार्गावर मिळणारे सहाय्य (रोडसाइड असिस्टन्स) – रोड साइड असिस्टन्स द्वारे संपर्क साधून चोवीसतास कधी ही अडचणीच्या काळात मदत मिळू शकते. यामुळे चालक चिंतामुक्त होऊन वाहन चालवू शकतो.

·        सर्विसिंगची आठवण करून देणाऱ्या सूचना (सर्विस रीमाइन्डर अलर्ट) – तुमचे वाहन सुस्थितीत असल्याची खात्री करण्यासाठी वेळेवर सर्विसिंग करण्याची सूचना मिळवा.

·        सर्विसिंग नोंदणी (सर्विसिंग बूकिंग)- वाहनाची सर्विसिंग करण्यासाठी वेळ अॅप द्वारे बूक करू शकता. 

·        ग्राहक सेवा (कस्टमर केअर)- लौकरात लौकर प्रश्न सोडविण्यासाठी ग्राहक सेवा केंद्राबरोबर त्वरित संपर्क साधता येतो.

·        मार्गदर्शक संदर्भ (रेफ्रेन्स गाइड)- यातील मार्गदर्शक संदर्भाच्या मदतीने तुमच्या वाहनाबाबत अधिक माहिती जाणून घ्या.

1 COMMENT

  1. […] वेंगुर्ला प्रतिनिधी- नुकत्याच पार पडलेल्या वेंगुर्ला तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत विजयी झालेल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या सरपंच, उपसरपंच व सदस्य यांचा २४ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता साई मंगल कार्यालय येथे खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते सत्कार करण्याचे नुकत्याच झालेल्या शिवसेनेच्या मासिक बैठकीत ठरविण्यात आले. या बैठकीत आगामी निवडणुकांसंदर्भातही चर्चा करण्यात आली.http://sindhudurgsamachar.in/maharashtra-महिंद्राने-त्यांच्या… […]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here