सिन्नर, दि. १० (क्री.प्र.स्वाती घोसाळकर) –तब्बल 8 सुवर्ण पदकांसहीत राजस्थाने 27 व्या राष्ट्रीय रोड रेस स्पर्धेचे सर्वसाधारण विजेतेपद पटकावले. यजमान महाराष्ट्राला 4 सुवर्ण पदकांसह उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं. सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया आणि सायकलिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या वतीने या राष्ट्रीय रोड सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धेचे सिन्नर तालुक्यातील समृद्धी महामार्गावर आयोजन केले होते.
या स्पर्धेत राजस्थानने ८ सुवर्ण, ६ रौप्य आणि ७ कांस्य अशी २१ पदके मिळवत पहिलं स्थान पटकवलं. तर महाराष्ट्राने ४ सुवर्ण, २ रौप्य आणि ७ कांस्य अशी एकूण १३ पदकांची कमाई केली. हरयाणा संघाला ९ पदकांसह तिसऱ्या क्रमांक मिळवता आला. सायकलिंग फेडरेशन ऑफ आशियाचे अध्यक्ष ओंकार सिंग यांच्या उपस्थितीत स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले.
यावेळी सायकालिंग फेडरेशन ऑफ इंडियायचे खजिनदार प्रताप जाधव, महाराष्ट्र फेडरेशनचे सचिव प्राध्यापक संजय साठे, छत्रपती पुरस्कार विजेते विजय जाधव, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे अधिकारी, परिसरातील ग्रामपंचायतींचे पदाधिकारी उपस्थितीत होते.
photo caption – 27 व्या राष्ट्रीय रोड सायकलिंग अजिंक्य स्पर्धेचे सर्वसाधारण उपविजेतेपद पटकावणारा महाराष्ट्र संघ