Maharashtra: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जेष्ठ स्वयंसेवक जयसिंग नलावडे यांचे निधन!

0
56
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जेष्ठ स्वयंसेवक जयसिंग नलावडे यांचे निधन!

मुंबई- चेंबूर येथील भाजपचे मा. मंडळ अध्यक्ष व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जेष्ठ स्वयंसेवक आणि भाजपाच्या राष्ट्रीय महिला मोर्चाच्या माजी अध्यक्षा व माजी आमदार डॉ. कांताताई नलावडे यांचे पती जयसिंगराव(अण्णा) तुकाराम नलावडे यांचे मुंबईतील मुंबईतील चेंबूर येथील ‘झेन’ या खाजगी रुग्णालयात अल्पशा आजाराने सोमवारी २७ डिसेंबर रोजी रात्री निधन झाले. ते ८३ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी डॉ. कांताताई नलावडे, मुलगा अमोल, सून नैना, मुलगी शिल्पा नलावडे – कुलकर्णी, जावई आर्किटेक अमित कुलकर्णी व नातवंडे असा समृद्ध परिवार आहे. त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात मंगळवारी चेंबूर येथे विद्युत दाहिनीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे अंतिम दर्शन राजकीय, सामाजिक, साहित्य क्षेत्रातील मान्यवरांनी घेतले. https://sindhudurgsamachar.in/कर्नाटकचे-मुख्यमंत्री-आ/

जयसिंग नलावडे यांनी १९६२-१९७० यादरम्यान पूर्णवेळ ‘जनसंघा’मध्ये स्वतःला  वाहून घेतले होते. त्यांनी १९७२ च्या काळात ‘आणीबाणी’ सुरु असताना मुंबईत भूमिगत राहून ‘जनसंघा’च्या चळवळीत महत्वाचे योगदान दिले आहे. १९७५ पासून ‘जनता पार्टी’च्या निष्ठावान कार्यकर्त्याची भूमिका निभावत पक्ष वाढीसाठी बळकटी दिली. १९८० मध्ये ‘जनता पार्टी’चे ‘भारतीय जनता पार्टी’त विलीनीकरण झाल्यानंतर १९८५ मध्ये त्यांनी पक्षातर्फे कॉर्पोरेशनची निवडणूक लढवली. पाच दशकांपूर्वी आपली सुविद्य पत्त्नी कांताताई यांचे राजकारणातील वर्चस्व आणि कार्य पाहून त्यांना प्रोत्साहन – पाठिंबा देण्याची भूमिका अखेरपर्यंत त्यांनी निभावली. सोबत पुस्तक छपाईच्या व्यवसायात विपुल कार्य करून अनेक दर्जेदार पुस्तकांची निर्मिती केली. साहित्य संस्कृती मंडळाच्या पुस्तकांची छपाई करण्यात ते अग्रेसर होते.

त्यांच्या निधनाचे वृत्त ऐकून महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार, माजी केंद्रीय मंत्री खा. प्रकाश जावडेकर, खा. उदयनराजे भोसले, मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार, आ मनिष चौधरी यांसह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी डॉ. कांताताई आणि त्यांच्या परिवाराचे सांत्वन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here