Maharashtra: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षेत पीसीसीओईने पटकाविले अकरा सुवर्ण पदके

0
35
पीसीसीओई ,
पीसीसीओई ची पोरं हुश्शार !!! सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षेत पीसीसीओईने पटकाविले अकरा सुवर्ण पदके

दर्जेदार उच्च शिक्षणासाठी पीसीईटी अग्रेसर …महाविद्यालयात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना उच्च दर्जाच्या सुविधा तसेच दर्जेदार शिक्षण देण्यासाठी पीसीईटी नेहमीच अग्रेसर आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी हे वेळोवेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असतात. गेल्या काही वर्षात संस्थेने परदेशातील २३ विद्यापीठे, अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांबरोबर शैक्षणिक सामंजस्य करार केले आहेत. या कराराच्या माध्यमातून तेथील शिक्षण पद्धती, कंपन्यांमधील विज्ञान, तंत्रज्ञानाचा वापर जवळून पाहण्याची संधी मिळते. त्यामुळेच विद्यार्थ्यांबरोबरच प्राध्यापकांनाही या अनुभवाचा भविष्यातील वाटचालीसाठी उपयोग होतो. म्हणूनच पीसीईटी मध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी समोर येणाऱ्या आव्हानांना खंबीरपणे सामोरे जात यशस्वी होतातच असा विश्वास आहे असे पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे यांनी सांगितले.

पिंपरी, पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अभियांत्रिकी शाखेच्या अंतिम वर्ष परिक्षेच्या (मे २०२२) निकालातील सुवर्णपदकांच्या पुरस्काराबाबत नुकतीच घोषणा करण्यात आली. या परीक्षेत पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या (पीसीसीओई) विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण होऊन विद्यापीठाच्या वतीने देण्यात येणारी अकरा सुवर्ण पदके मिळवून घवघवीत यश संपादन केले. यामध्ये मनजितसिंग इंद्रसिंग गिरासे, हर्षदा विजय खिलारी व श्रेया महेश गुंजाळ यांचा समावेश आहे. https://sindhudurgsamachar.in/maharashtra-आचार्य-बाळशास्त्री-जां/

भारतामध्ये दर्जेदार उच्च शिक्षण देणाऱ्या काही मोजक्या संस्थांमध्ये पीसीईटी शैक्षणिक समुहाचा समावेश होतो. तसेच जागतिक पातळीवरही पीसीईटीने शैक्षणिक क्षेत्रात नावलौकिक प्राप्त केला आहे. विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेच्या निकालात पीसीसीओईच्या श्रेया महेश गुंजाळ (बीई मेकॅनिकल) हिने टेक. एम. फेलो अवॉर्ड, टेक महिंद्रा लि., कै. आयुर्वेद तीर्थ हरी विष्णु देसवंडीकर, जी. एस. रायसोनी, वामन केशव सावळे, पद्मश्री कै. कर्मवीर काकासाहेब वाघ ही चार सुवर्ण पदके मिळवून घवघवीत यश संपादन केले. विशेष म्हणजे श्रेया गुंजाळ हिने अंतिम वर्षाच्या च्या सर्व शाखांमध्ये सर्व महिला विद्यार्थ्यांमध्ये प्रथम स्थान पटकावले आहे. तसेच मनजितसिंग इंद्रसिंग गिरसे (बीई सिव्हिल) याने पी. एस. शारंगपाणी, जी. एस. रायसोनी, डॉ. पी. डी. पाटील ही तीन सुवर्ण पदके मिळवली आहेत आणि हर्षदा विजय खिलारी (बीई इ ॲण्ड टीसी) हिने कै. गोविंद काशिनाथ वाणी, जी. एस. रायसोनी, कै. श्रीकांत रामचंद्र कुलकर्णी ही तीन सुवर्ण पदके पटकावली आहेत. 

  पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, पीसीसीओई संचालक डॉ. गोविंद कुलकर्णी, उपसंचालक डॉ. नीळकंठ चोपडे यांनी यशस्वी विद्यार्थी आणि प्राध्यापकांचे अभिनंदन केले.

Search for all messages with label Inbox

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here