गुढी पाडवा आणि नववर्षाच्या आमच्या वाचक ,हितचिंतक आणि जाहिरातदार यांना दैनिक सिंधुदुर्ग समाचार कडून हार्दिक शुभेच्छा!
खरं तर गुढी पाडवा येतो तोच वसंताची चाहूल लागत.हिवाळा आणि उन्हाळा यातील हा संधी काळ असतो. या काळात ऊन अतिशय दाहक असते. अशावेळी उन्हाळाबाधू नये म्हणून या सणादिवशी कडुलिंबाचा पाला गुढीलासुद्धा बांधला जातो आणि त्याची चटणीही या दिवशी बनविली जाते. या दिवशी या निंबाची पान गरम पाण्यात घालून त्याची आंघोळही करण्याची प्रथा आहे.यामुळे शरीराला थंडावा मिळतो. गोवर ,कांजण्याच्या जंतूंना अटकाव होतो. त्यामुळेच या आजारानंतरही मुलांना कडुनिंबाच्या पानाच्या पाण्याने आंघोळ घातली जाते. https://sindhudurgsamachar.in/ratnagiri-रत्नागिरी-जिल्ह्यात-को
आपले सण हे निसर्ग आणि मानव यांच्या मेळ घालत निसर्गाला जपत त्याच्या साथीने साजरे केले जातात. तर अशा या बहुगुणी कडुलिंबाची झाड प्रखर उन्हात भरघोस सावलीही म्हणजेच थंडावा देतात म्हणून उन्हाळ्याच्या सुरुवातीला या झाडाला मान देत उन्हाळ्याचे स्वागत आपण करतो