पुणे- राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमध्ये ग्रामविकास विभागाच्या अखत्यारीतील जिल्हा परिषदअंतर्गत गट-क मधील आरोग्य व इतर विभागांतील एकूण 18 हजार 939 पदे भरली जाणार आहेत.
त्यासाठी आयबीपीएस या कंपनीची नियुक्ती करण्यात आली असून, पदभरतीला जिल्हा परिषदांनी सर्वोच्च प्राथमिकता द्यावी, अशा सूचना ग्रामविकास विभागाचे उपसचिव विजय चांदेकर यांनी दिल्या आहेत. https://sindhudurgsamachar.in/kokan-रत्नागिरी-सिंधुदुर्ग-वी/
चांदेकर यांनी राज्यातील जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकार्यांना दिलेल्या निर्देशानुसार, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षांत 75 हजार सरळसेवा कोट्यातील पदे भरण्याचा शासनाने निर्धार केला असून, दि. 15 ऑगस्ट, 2023 पूर्वी संबंधित पदे भरावयाची आहेत. ग्रामविकास विभागाच्या अखत्यारीतील जिल्हा परिषद अंतर्गत गट-क मधील आरोग्य व इतर विभागातील संवर्गांच्या पदभरती कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.


