नागपूर, दि.२०: ‘पोहा चालला महादेवा’ सारख्या अजरामर नाट्यकृतीने महाराष्ट्राच्या रंगभूमीवर स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करणारे ज्येष्ठ रंगकर्मी श्री. मदन गडकरी यांच्या निधनाने वैदर्भीय रंगभूमी ज्येष्ठ मार्गदर्शकाला मुकली आहे.https://sindhudurgsamachar.in/maharashtra-माझा-गणेशोत्सव-माझा-म/
मदनजी गडकरी यांनी जवळपास सात दशके रंगभूमीची सेवा केली. त्यांच्या तालमीत तयार झालेले अनेक कलावंत आज मराठी रंगभूमी व चित्रपटसृष्टी गाजवत आहेत. त्यांच्या निधनाने वैदर्भीय रंगभूमीने जुन्या पिढीतील महत्त्वाचा मार्गदर्शक गमावला आहे, असेही राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.