शिरगाव : महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा (MHT-CET) 2026 मध्ये शिरगाव हायस्कूलची माजी विद्यार्थिनी कुमारी चंदना पवार हिने 97.44 पर्सेंटाइल गुण मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. तिच्या या यशामुळे शिरगाव हायस्कूल तसेच परिसरातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
चंदना पवार हिने कठोर परिश्रम, जिद्द आणि सातत्यपूर्ण अभ्यासाच्या जोरावर हे यश मिळविले आहे. स्पर्धात्मक परीक्षांमध्ये यश संपादन करण्यासाठी आवश्यक असलेली चिकाटी आणि समर्पण यांचे उत्तम उदाहरण तिने घालून दिले आहे. तिच्या या यशामुळे इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळणार आहे.
या यशाबद्दल शिरगाव हायस्कूल परिवाराने चंदनाचे अभिनंदन करत तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. “हे यश तुझ्या मेहनतीचे, जिद्दीचे आणि स्वप्नपूर्तीचे प्रतीक आहे,” अशा शब्दांत विद्यालयाने तिचा गौरव केला आहे.
चंदना पवार हिच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे शिरगाव हायस्कूलच्या गुणवत्तापूर्ण शिक्षण परंपरेचा पुन्हा एकदा गौरव झाला असून विद्यार्थ्यांसाठी ती प्रेरणास्थान ठरली आहे.