ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (DCGI) म्हणजेच औषध नियंत्रण महासंचालकांनी Moderna या लसीच्या आयातीस मान्यता दिली आहे. मॉडर्ना कंपनीने औषध नियंत्रण महासंचालकांकडे लसीची आयात व विक्री करण्याची परवानगी मागितली होती. त्यामुळे देशात आता कोविशील्ड, कोवॅक्सीन, स्पुटनिक आणि मॉडर्ना या एकूण 4 लसी देशातील नागरिकांसाठी उपलब्ध असतील.
अमेरिका, युरोप, इंग्लंड, जापान या देशांत ज्या लसींना जागतिक आरोग्य संघटनेने मंजुरी दिली आहे त्या लसींच्या ब्रिजींग चाचण्यांची हिंदुस्तानात गरज भासणार नाही असं जाहीर करण्यात आलं होतं. यामुळे मॉडर्ना लसीला मान्यता मिळण्याचा मार्ग मोकळा झाला होता.