Mumbai: मुंबईत रहिवासी इमारत कोसळून ११ जणांचा मृत्यू

0
69

मुंबईत बुधवारी मुसळधार पाऊस झाला. पावसामुळे शहरातील मालवानी परिसरातील एक चार मजली इमारत कोसळली आहे. मालाड पश्चिमेला असणाऱ्या न्यू कलेक्टर कंपाऊंड येथे ही दुर्घटना घडली आहे. मालाडमधील मालवानी परिसरातील एक चार मजली इमारत रात्री 11.10 वाजेच्या सुमारास दुसऱ्या एका इमारतीवर कोसळली. या दुर्घटनेत 11 जणांचा मृत्यू झाला, तर 7 जण गंभीर जखमी आहेत.

यानंतर आसपासच्या इमारतींमधील रहिवाशांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आलं आहे. घटनास्थळी बचावकार्य सुरु असल्याची माहिती पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली असून मृतांच्या संख्या वाढण्याची भीती आहे.ढिगाऱ्याखाली काहीजण दबले असल्याची भीती असून मृतांची संख्या वाढण्याची भीती आहे.

घटनेनंतर फायर बिग्रेड आणि पालिकेच्या पथकांनी घटनास्थळी धाव घेऊन युद्ध पातळीवर बचावकार्य सुरू केले.गल्लींची रुंदी लहान असल्यामुळे अँबुलंस, फायर ब्रिगेडची गाडी आणि जेसीबीला आत जाण्यासाठी अडचणी येत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here