१४ सप्टेंबरपर्यंत रिचार्ज नसलेले कार्ड व बुकिंग पावतीही बस भाडे सवलतीसाठी ग्राह्य
मुंबई :
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) NCMC कार्डधारक प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना जारी करण्यात आली आहे. १४ सप्टेंबरपर्यंत NCMC कार्ड रिचार्ज नसलेले कार्ड तसेच NCMC कार्डाची बुकिंग पावतीही बस भाडे सवलतीसाठी ग्राह्य धरली जाणार आहे.
प्रवाशांना NCMC कार्डचे रिचार्ज करण्याची सुविधा बस कंडक्टर तसेच खासगी एजंटांकडे उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांनी आवश्यकतेनुसार आपल्या NCMC कार्डचे रिचार्ज करून घ्यावे.
सोप्या आणि सुविधाजनक तिकीट बुकिंगसाठी प्रवाशांनी आजच आपले MSRTC NCMC कार्ड प्राप्त करून घ्यावे आणि अधिक सुलभ प्रवासाचा आनंद घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.