प्रवाशांची सुविधा लक्षात घेऊन NCMC कार्ड रिचार्ज करण्यासाठी ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे आता प्रवाशांना कार्ड रिचार्ज करण्यासाठी प्रत्यक्ष रिचार्ज केंद्रावर जाण्याची आवश्यकता नसून ऑनलाइन माध्यमातून रिचार्ज करता येणार आहे.
या सुविधेमुळे प्रवाशांचा वेळ वाचणार असून, प्रवासाच्या आधी घरबसल्या NCMC कार्डमध्ये आवश्यक रक्कम रिचार्ज करता येणार आहे. डिजिटल पद्धतीने रिचार्जची सुविधा उपलब्ध झाल्याने सार्वजनिक वाहतूक वापरणाऱ्या प्रवाशांना अधिक सोयीचे होणार आहे.