Omicron: महाराष्ट्र सरकारची नवी नियमावली आणि लक्षात ठेवण्याच्या महत्वाच्या गोष्टी

0
69
  • 1) कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉन वेगाने पसरण्याची शक्यता आहे. हा डेल्टा पेक्षा 5 पट जास्त सांसर्गिक असू शकतो.
    2) महाराष्ट्रात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत प्रवाशांना केंद्र सरकारनं जारी केलेल्या सर्व कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन करणं बंधनकारक आहे.
    3) दक्षिण आफ्रिका, बोत्सवाना आणि झिम्बाब्वे यांचा उच्च जोखमीच्या देशांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे.
    4) हाई रिस्क श्रेणीत येणाऱ्या देश किंवा राज्यातून येणाऱ्या प्रवाशांसाठी महाराष्ट्रातील प्रत्येक एअरपोर्टवर RT-PCR टेस्ट अनिवार्य असेल. देशांतून किंवा राज्यातून येणाऱ्या प्रवाशांना मागील 15 दिवसांत केलेल्या प्रवासाची संपूर्ण माहिती द्यावी लागेल.
    5) बाहेरून येणाऱ्या प्रवाशांना 7 दिवस संस्थात्मक क्वारंटाईन राहावं लागेल. सातव्या दिवशी पुन्हा एकदा RT-PCR टेस्ट होईल. त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यास त्यांना तातडीनं हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात येईल. तर रिपोर्ट निगेटिव्ह आल्यास एक आठवडा होम क्वारंटीन केलं जाईलं
  • 6)देशांतर्गत प्रवाशांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेले असावे. किंवा त्यांचा 72 तासांच्या आतील RT-PCR रिपोर्ट निगेटिव्ह असावा.

आतापर्यंत 29 देशांमध्ये ओमिक्रोचे 373 रुग्ण आढळून आले असून या सर्व संक्रमित रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे आढळून आली आहेत.अशा रुग्णांमध्ये कोणतीही गंभीर लक्षणे आढळून आलेली नाहीत. WHO याचा अभ्यास करत आहे. सध्या लॉकडाऊन लावण्याची गरज नसून या नव्या आव्हानाला आपण तोंड देऊ. मास्क घालणे ही जनतेची जबाबदारी आहे. कोरोनाचे लसीकरणं महत्वाचे असून बूस्टर डोसही लवकरात लवकर सर्वांनी घ्यावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here