( संगमेश्वर / वृत्तसेवा)
वांद्री येथे क्रिकेट खेळण्यासाठी जाणाऱ्या दुचाकीवरील दोन तरुणांची स्विफ्ट डिझायर जोरदार धडक बसून दोन्ही तरुण गंभीर जखमी झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. प्रफुल्ल गोनबरे (22, परचुरी, संगमेश्वर), ओंकार भोसले (22, मानसकोंड, संगमेश्वर) अशी दोन्ही जखमिंची नावे आहेत. हा अपघात नुकताच झाला असून अपघातातील जखमींना उपचारासाठी संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-मत्स्यव्यवसाय-विभागाम/
परचुरी येथील प्रफुल्ल गोनबरे हा आपल्या ताब्यातील यामाहा दुचाकी (MH 08 DW 7228) वरुन मानस कोंड येथील ओंकार भोसले याला घेऊन वांद्री येथे क्रिकेट खेळण्यासाठी जात असता. मानसकोंड येथील खडी क्रशरसमोर एका ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या नादात समोरून येणाऱ्या स्विफ्ट डिझायर (MH 02, Ek 0961) या गाडीला प्रफुल्ल याने जोरदार धडक बसली. प्रफुल्ल हा गाडीवर जोरदार आदळला. यामध्ये त्याच्या डोक्याला आणि गुप्तांगला दुखापत झाली. तर ओमकार भोसले हा रस्ताच्या बाहेर फेकला गेल्याने जखमी झाला. अपघातात स्विफ्ट कारचे दर्शनी भागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
अपघाताची माहिती पोलिस पाटील सुनील शिगवण यांना माहीती मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर संगमेश्वर पोलिसाना याची माहिती देण्यात आली. संगमेश्वर पोलिस आणि सोबतच संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयाचे १०८ चे डॉ स्नेहल शेलार, पायलट काशिनाथ फेपडे घटनास्थळी दाखल झाले. जखमीना तातडीने प्राथमिक उपचार देवून तातडीने संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.