रत्नागिरी- राजापूर तालुक्यातील रायपाटण येथे शेकोटीला बसलेली वृद्धा भाजून जखमी झाली. ही घटना सोमवारी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास घडली. भागिरथी शिवराम पवार (७२, रा. रायपाटण राजापूर) असे जखमीचे नाव आहे. त्यांना उपचारासाठी रत्नागिरी जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-रहाते-घर-जमिन-मालकाने-जे/
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भागिरथी पवार या सोमवारी सकाळी ६ वाजता आपल्या राहत्या घरी शेकोटीसाठी बसल्या होत्या. यावेळी आगीच्या भडक्यामध्ये त्यांच्या अंगावरील साडीने पेट घेतला त्यांना तातडीने उपचारासाठी रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालय येथे दाखल करण्यात आले. याप्रकरणी पुढील तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.