Ratnagiri हापूस आंबा थेट विक्री करण्याच्या दृष्टीने आंबा उत्पादकांनी नोंदणी करण्याचे आवाहन

0
74
हापूस आंबा आंबा उत्पादक

रत्नागिरी – हापूस आंबा थेट विक्रीसाठी बाजारपेठ उपलब्ध करण्याच्या दृष्टीने उत्पादक ते थेट ग्राहक विक्री असा उपक्रम महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळामार्फत राबविला जातो.या उपक्रमाला नेहमीच उत्सफुर्त प्रतिसाद मिळतो. त्यामुळे यावर्षीच्या आंबा हंगाम 2023 करिता आंबा उत्पादकांना आंबा विक्रीसाठी पुणे आणि राज्यातील, परराज्यातील इतर शहरांमध्ये स्टॉल उपलब्ध करण्यात येत आहेत. त्यासाठी आंबा उत्पादकांची नोंदणी दि. 6 फेब्रुवारी 2023 पासून सुरु करण्यात येणार आहे. अशी माहिती कृषि पण मंडळाचे उपसरव्यवस्थापक डॉ. भास्कर ना. पाटील यांनी दिली आहे. https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-अनिल-सौदागर-व-मंदाकिनी-स/

आंबा स्टॉल नोंदणी करिता आंबा नोंदीसह 7/12 उतारा (मागील 6 महिने कालावधीतील), आधार कार्ड तसेच स्टॉलवर विक्री करणाऱ्या कुटुंबातील व्यक्तीचे आधार कार्ड प्रत व कोरोना प्रतिबंधक लसीचे 2 डोस घेतल्याचे प्रमाणपत्र, भौगोलीक मानांकन नोंदणी प्रामणपत्र प्रत, महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळाचे नावे रु.10,000/- अनामत रक्कमेचा धनाकर्ष अथवा यापूर्वी अनामत रक्कम भरणा केली असल्यास पावतीची प्रत तसेच विहीत नमुन्यातील अर्ज व हमीपत्र इ. कागदपत्रे नोंदणीसाठी आवश्यक आहेत.

इच्छुक आंबा बागायतदारांनी महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ, विभागीय कार्यालय, कृषी उत्पन्न बाजार समिती, रत्नागिरी आवार शांतीनगर, नाचणे, जि.रत्नागिरी (02352-299328)अथवा श्री. कपिल खामकर, कृषी व्यवसाय पणन तज्ञ(8805652233) यांचेशी संपर्क साधून नांव नोंदणी करावी, असे आवाहन कृषी पणन मंडळाच्या वतीने करण्यात येत आहे. नाव नोंदणीसाठीचे अर्ज सादर करण्याची अंतीम तारीख 28 फेब्रुवारी आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here