Reliance Jio यूजर्सना नाराज करणारी बातमी

0
88

आज गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर रिलायन्स जिओ कंपनी सर्वात स्वस्त 4G स्मार्टफोन JioPhone Next विक्रीसाठी उपलब्ध करून देणार होती. मात्र, कंपनीनं JioPhone Next चा सेल तुर्तास पुढे ढकलला आहे. त्याशिवाय Reliance Jio नं कोणतीही घोषणा न करता एक मोठा निर्णय घेतला आहे. Jio ने आपले दोन स्वस्त प्रीपेड प्लान अचानक बंद केले आहेत.हे दोन स्वस्त प्रीपेड प्लान 39 रुपये आणि 69 रुपये किमतीचे होते. कंपनीकडून अद्याप याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

या आधी देखील जिओ आपल्या ग्राहकांना झटका दिला होता. कंपनीनं Buy 1 Get 1 Free ऑफर देखील गुंडाळली आहे.जिओचा 39 रुपयांचा आणि 69 रुपयांचा असे दोन सर्वात स्वस्त प्लान होते.मात्र, आता यूजर्सला या प्लानचा लाभ घेता येणार नाही. कारण , Jio च्या वेबसाइटवर दोन्ही प्लान लिस्टेड नाही.

39 रुपये आणि 69 रुपयांच्या दोन्ही प्लान्समध्ये केवळ डेटाचा फरक आहे. यूजर्सला कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग देखील फ्री होती. याशिवाय डेली 100 एसएमएसची सुविधा मिळते. इतकंच नाही तर यूजर्सला Jio ऐप्सचं फ्री सब्सक्रिप्शन मिळत होते. 39 रु ग्राहकांना 14 दिवसांची व्हॅलिडिटीसोबत डेली 100MB डेटा मिळत होता. या शिवाय 69 रुपयांच्या प्लानमध्ये 14 दिवसांची व्हॅलिडिटीसोबत डेली 0.5GB डेटा होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here