Sindhudurg:शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी निवडून आलेल्या सरपंच-सदस्यांचा केला सत्कार

0
122

सावंतवाडी : गावच्या विकासासाठी निवडून आलेल्या सरपंच व सदस्यांना सर्वतोपरी मदत देऊन सहकार्य केले जाईल. तसेच गावच्या विकासासाठी जास्तीत जास्त निधी दिला जाईल अशी ग्वाही शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकारने आज येथे दिली. ते येथील निवडून आलेल्या सरपंच सदस्यांच्या सत्कार समारंभ कार्यक्रमा निमित्त बोलत होते. यावेळी श्री. केसरकर यांच्या उपस्थितीत निवडून आलेल्या सरपंच व सदस्यांचा सत्कार करण्यात आला.https://sindhudurgsamachar.in/maharashtra-महाराष्ट्र-शिक्षक-पात्/

यावेळी मंत्री केसरकर बोलताना पुढे म्हणाले की राज्यात शिंदे व भाजपचे सरकार आले असून या सरकारने जनतेला न्याय देण्याचे काम केले आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात महाराष्ट्र राज्य हे प्रगती दिशेने जाईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. तसेच निवडून आलेल्या सरपंचांनी युतीचा धर्म पाळावा असे आव्हान शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे केले. तसेच आपल्या गावात 80 % शेतकऱ्यात त्यांच्यासाठी आपल्याला कसे काम करता येईल याचा देखील आपण सर्वांनी विचार करावा असेही केसरकर यांनी यावेळी बोलताना म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here