Sindhudurg: अनिल सौदागर व मंदाकिनी सामंत पुरस्काराने सन्मानीत

0
39
अनिल सौदागर व मंदाकिनी सामंत पुरस्काराने सन्मानीत

वेंगुर्ला प्रतिनिधी- सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी संघाच्या ३१ डिसेंबर रोजी वेंगुर्ला येथे संपन्न झालेल्या भव्य व्यापारी मेळाव्यात महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अॅण्ड अॅग्रीकल्चरचे अध्यक्ष ललित गांधी यांच्या हस्ते अनिल श्रीकृष्ण सौदागर (वेंगुर्ला) यांना जीवन गौरव पुरस्काराने तर नर्मदा कॅश्यू फॅक्टरीच्या संचालिका मंदाकिनी दिलीप सामंत (वेंगुर्ला) यांना महिला उद्योजक पुरस्काराने गौरविण्यात आले. http://sindhudurgsamachar.in/सावंतवाडीचा-सुपुत्र-निला/

सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचे माजी अध्यक्षवेंगुर्ला तालुका व्यापारी संघाचे बरीच वर्षे अध्यक्षपद भुषविलेले व गेली ३० वर्षे जिल्हा व्यापारी महासंघाच्या कार्यकारीणीवर काम करीत असलेलेत्याच प्रमाणे सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी पतसंस्था संस्थापक असलेले व १२ वर्षे अध्यक्षपद भुषविणारेसिंधुदुर्ग जिल्हा कंन्झुमर डिस्ट्रीक असोसिएशनचे संस्थापक व माजी अध्यक्षपद अशी पदे भुषविलेलेगेली १९७२ पासून सुमारे ५० वर्षे व्यापार व्यवसायात कार्यरत असलेले आणि नगर वाचनालय वेंगुर्ला या संस्थेची धुरा सामाजिक काम म्हणून सांभाळणारे अनिल श्रीकृष्ण सौदागर यांना जीवन गौरव पुरस्कार जाहीर झाला होता. तर वेंगुर्ला-भटवाडी येथील नर्मदा कॅश्यू फॅक्टरीच्या माध्यमातून सन १९८३ पासून अनेक महिलांना रोजगार देणा-या तसेच सुमारे ५० ते ६० कुटुंबांना जोडणाचे काम केलेल्या आणि महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचा महिला उद्योजक पुरस्कार पटकाविलेल्या मंदाकिनी दिलीप सामंत यांची श्रीमती माई आरोसकर महिला उद्योजक पुरस्कारासाठी निवड केली होती.

पुरस्कार प्रदान करतेवेळी उद्योजक रघुवीर मंत्रीमहाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अॅण्ड अॅग्रीकल्चरचे वरिष्ठ उपाध्यक्ष उमेश दाशरथीसारस्वत बँक संचालक सुनिल सौदागरजीएसटी कौन्सिलचे सदस्य सीए. उमेश शर्मामहाराष्ट्र  वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रताप होगाडे,कंझ्युमर प्रॉडक्टस् डिस्टीब्युटर्स सिंधुदुर्गचे अध्यक्ष अरविंद नेवाळकरकेमिस्ट अॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशन सिंधुदुर्गचे अध्यक्ष आनंद रासमपरीट संघटना सिंधुदुर्गचे अध्यक्ष दिलीप भालेकरकुक्कुट पालन व्यवसाय असोसिएशन सिंधुदुर्गचे अध्यक्ष प्रकाश म्हाडगुतविज ग्राहक संघटना सिंधुदुर्गचे अध्यक्ष संतोष काकडेहॉटेल मालक उन्नत्ती संघ सिंधुदुर्गचे अध्यक्ष राजन नाईकटोलमुक्त सिंधुदुर्ग कृती समितीचे अध्यक्ष द्वारकानाथ घुयेजिल्हा व्यापारी महांसघाचे अध्यक्ष प्रसाद पारकरकार्यवाह नितीन वाळकेकोषाध्यक्ष अरविद नेवाळकरसहकार्यवाह राजू जठारजिल्हा सदस्य राजेश शिरसाटवेंगुर्ला तालुका व्यापारी संघटना अध्यक्ष विवेक खानोलकरसचिव राजन गावडेखजिनदार सखाराम सौदागर उपस्थित होते.

फोटोओळी – अनिल श्रीकृष्ण सौदागर यांना जीवन गौरव पुरस्काराने तर  मंदाकिनी दिलीप सामंत यांना महिला उद्योजक पुरस्काराने गौरविण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here