Sindhudurg: अर्जुन रावराणे विद्यालय वैभववाडी येथे ५० वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन उत्साहात संपन्न

0
78
अर्जुन रावराणे विद्यालय वैभववाडी येथे ५० वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन उत्साहात संपन्न

तालुक्यातील विद्यार्थ्यांनी विज्ञानाकडे वळून जिल्ह्याचे प्रतिनिधित्व यशस्वीरित्या राज्यस्तरावर करावे.! गटशिक्षणाधिकारी मुकुंद शिनगारे यांनी व्यक्त केली इच्छा

वैभववाडी (मंदार चोरगे) – सध्या सर्वत्र तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात वैभववाडी तालुक्यात देखील अर्जुन रावराणे विद्यालय, कै. हेमंत केशव रावराणे कनिष्ठ महविद्यालय व जयेंद्र रावराणे सेमी इंग्लिश मिडीयम स्कूल वैभववाडी या प्रशालेत ५० वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन गुरुवार दि.१२ जानेवारी व शुक्रवार दि.१३ जानेवारी २०२३ या दोन दिवसांमध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाले. सदर विज्ञान प्रदर्शनाच्या सुरवातीस उद्घाटन प्रसंगी विद्यालयाचे विज्ञान शिक्षक प्रा. योगेंद्र चव्हाण यांच्या संकल्पनेतून न्यूटनच्या तिसऱ्या गतिविषयक नियमावर आधारित रॉकेट हवेत सोडून एक प्रात्यक्षिक सादर करण्यात आले या प्रात्यक्षिकाच्या सादरीकरणाने उपस्थित सर्व विज्ञान प्रेमींची मने जिंकली. विज्ञान प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी शुक्रवार दि.१३-०१-२०२३ रोजी विज्ञान प्रदर्शनातील सर्व गटातील प्रतिकृती कक्षाचे तज्ञ परिक्षकांच्या माध्यमातून निरीक्षण करून अनुक्रमे प्रथम तिन क्रमांक काढण्यात आले. संपूर्ण तालुक्यातून प्राथमिक गटात विद्यार्थ्यांच्या एकूण २७ प्रतिकृती तर माध्यमिक गटातून एकूण २० प्रतिकृती प्रदर्शनासाठी मांडण्यात आल्या होत्या. दुपारच्या सत्रात प्रतिकृतीचे प्रदर्शन पाहण्यासाठी तालुक्यातील अनेक शाळांचे विद्यार्थी शिक्षक पालक मोठ्या संख्येने प्रदर्शन स्थळी दाखल झाले होते.

विज्ञान प्रदर्शनाच्या निमित्ताने गट इ ५ वी ते ८ वी प्राथमिक गट तर ९ वी ते १२ वी माध्यमिक गट अशा दोन गटांमध्ये निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, प्रश्नमंजुषा स्पर्धा या स्पर्धांचे देखील आयोजन करण्यात आले होते. प्राथमिक गटात एकूण २४ शाळा व माध्यमिक गटातून एकूण १३ शाळांनी सहभाग घेतला होता. या विज्ञान प्रदर्शनाचा निकाल पुढीलप्रमाणे – निबंध स्पर्धा प्राथमिक गट – प्रथम क्रमांक कु वेदिका भागोजी सुतार ( वि. म. सोनाली न १ ), द्वितीय क्रमांक कु. प्रथमेश औदुंबर तळेकर (मा. वी. करुळ) व कु. चंदना परशुराम गुरव (अर्जुन रावराणे विद्यालय वैभववाडी) तृतीय क्रमांक कु. सम्राट सुरेश पाटील (मा. वि. मांगवली), माध्यमिक गट प्रथम क्रमांक कु.तनया मंगेश कांबळे (म. सि. भुर्के मा. वि. मांगवली) व्दितीय क्रमांक कु. श्रेया संदीप शेळके. ( यशवंराव चव्हाण वि. अचीर्णे), तृतीय क्रमांक कु.अर्पिता चंद्रकांत दळवी (मा. वि. उंबर्डे), वकृत्व स्पर्धा- प्राथमिक गट- प्रथम क्रमांक कु. कुमारी वैष्णवी विश्वनाथ चव्हाण (माध्यमिक विद्यालय करुळ), द्वितीय क्रमांक कु. चिन्मय दशरथ शिंगारे (अर्जुन रावराणे विद्यालय वैभववाडी), तृतीय क्रमांक कु. तन्वी संतोष शिरावडेकर (विद्यामंदिर सोनाळी नंबर १) माध्यमिक गट- प्रथम क्रमांक कु. खुशी गजानन गावनेर (न्यू इंग्लिश स्कूल हेत), द्वितीय क्रमांक कु. भक्ती विठोजी पाटील (हेमंत केशव रावराणे कनिष्ठ महाविद्यालय वैभववाडी), तृतीय क्रमांक सिमरन कादिर फरास (उर्दू माध्यमिक विद्यालय उंबर्डे कोळपे) , प्रश्नमंजुषा स्पर्धा- प्राथमिक गट- प्रथम क्रमांक कु. पार्थ संदीप कोलते., कु मंथन विकास शिंदे (माध्यमिक विद्यालय करुळ), द्वितीय क्रमांक कु. अर्जुन अजितसिंह काळे, कु. अथर्व जयवंत मोरे (श्री माधवराव पवार विद्यालय कोकीसरे) तृतीय क्रमांक कु. भार्गवी दीपक रावराणे, कु. रत्नदीप संतोष महादये. ( श्री भारत विद्या मंदिर लोरे नंबर १), माध्यमिक गट- प्रथम क्रमांक कु. अस्मिता विजयसिंह काळे, कु. मिताली धकलशेठ सरवणकर (श्री माधवराव पवार विद्यालय कोकिसरे.) द्वितीय क्रमांक कु. सानिया सत्यवान दळवी. कु ऋतुजा एकनाथ चौगुले (जुनिअर कॉलेज), तृतीय क्रमांक कु. समृद्धी सत्यवान दळवी. कु सिद्धी गोविंद गावडे. ( म शि भुर्के माध्यमिक विद्यालय मांगवली.), विद्यार्थी प्रतिकृती – प्राथमिक गट- प्रथम क्रमांक कु. कार्तिक बापू पवार (यशवंतराव चव्हाण विद्यालय अचिर्णे), द्वितीय क्रमांक कु. आयान आसिफ आरवाडे (माधवराव पवार विद्यालय कोकीसरे), तृतीय क्रमांक कु. आर्यन दिगंबर रावराणे (अर्जुन रावराणे विद्यालय वैभववाडी), माध्यमिक गट – प्रथम क्रमांक कु. तनिष खानविलकर (न्यू इंग्लिश स्कूल हेत), द्वितीय क्रमांक कु. सर्वेश संदीप रावराणे (माधवराव पवार विद्यालय कोकिसरे), तृतीय क्रमांक कु. राहुल संदीप मोरे (माध्यमिक विद्यालय करूळ), उत्तेजनार्थ अन्सार उस्मान नाचरे (उर्दू माध्यमिक विद्यालय उंबर्डे कोळपे), शिक्षक प्रतिकृती- प्राथमिक शिक्षक गट- प्रथम क्रमांक श्री संतोष भरडकर. (विद्यामंदिर नापणे नंबर १), द्वितीय क्रमांक श्रीमती राजश्री नामदेव शेट्ये. (विद्यामंदिर नाधवडे ब्राह्मणदेव), तृतीय क्रमांक श्री संजय संभाजी रासम. (भारत विद्यामंदिर लोरे शाळा नंबर १), उत्तेजनार्थ श्रीमती अस्मिता अंकुश सुतार (केंद्र शाळा खांबाले नंबर १), माध्यमिक शिक्षक गट – प्रथम क्रमांक श्री तुळसकर एस. एम. (यशवंतराव चव्हाण विद्यालय आचिर्णे), द्वितीय क्रमांक श्री लाड डी.पी. (विकास विद्यालय सडूरे -अरूळे) , तृतीय क्रमांक श्री चोरगे एम. एस. ( अर्जुन रावराणे विद्यालय वैभववाडी), प्रयोगशाळा परिचर प्रतिकृती- माध्यमिक गट – प्रथम क्रमांक श्रावणी रोहन रावराणे (अर्जुन रावराणे विद्यालय वैभववाडी), द्वितीय क्रमांक स्वप्निल तुकाराम बावदाणे. (अर्जुन रावराणे विद्यालय वैभववाडी)

या विज्ञान प्रदर्शन प्रसंगी कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले नाधवडे हायस्कूल चे मुख्याध्यापक डी एस पाटील सर यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले त्यांनी विजेत्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या शिवाय विद्यार्थ्यांनी व्यसनाच्या आहारी जाऊ नये असा मोलाचा सल्ला दिला. या विज्ञान प्रदर्शनाचे तालुका प्रमुख म्हणून तुळसकर सर आचिर्णे यांनी काम पाहिले. ‘विज्ञान प्रदर्शन हे विद्यार्थ्यांच्या बुद्धीला चालना देणारा उपक्रम आहे. नवनवीन उपक्रम राबविला जाणे तसेच नवनवीन विचार प्राप्त करण्यासाठी एक व्यासपीठ या विज्ञान प्रदर्शनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मिळत असते असे मत त्यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले. ‘विज्ञानातून ज्ञान व ज्ञानातून तंत्रज्ञान वाढते’ असे मत श्री गोसावी सर यांनी व्यक्त केले व विजेत्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे संयोजक वैभववाडी चे गटशिक्षणाधिकारी मुकुंद शिनगारे यांनी देखील उपस्थित विद्यार्थ्यांना अतिशय मोलाचे असे मार्गदर्शन केले. वैभववाडी तालुक्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी विज्ञानाकडे वळावे व जिल्ह्याचे प्रतिनिधित्व यशस्वीरित्या राज्यस्तरावर करावे अशी इच्छा त्यांनी या कार्यक्रम प्रसंगी व्यक्त केली. ५० व्या विज्ञान प्रदर्शनाची तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाणी आपल्या शाळेत जबाबदारी स्विकारल्या बद्दल गटशिक्षणाधिकारी शिणगारे यांनी वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेचे तसेच संस्था अधिक्षक जयेंद्र रावराणे व प्रशालेचे मुख्याध्यापक नादकर सर यांचे आभार व्यक्त केले. या विज्ञान प्रदर्शनास कृषि महाविद्यालय सांगुळवाडीचे प्राचार्य डॉ.डी बी पाटील, आनंदीबाई रावराणे महाविद्यालय वैभववाडी चे प्राध्यापक डॉ के पी पाटील. व कृषि महाविद्यालय सांगुळवाडी प्राध्यापिका एन ए तुपे तसेच प्राध्यापिका एस एम कारेकर यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मरळकर सर तसेच श्रीमती सावंत मॅडम व श्रीमती सबनीस मॅडम यांनी केले तर विज्ञान प्रदर्शन व अंतर्गत इतर कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व मान्यवरांचे व सहभागी विद्यार्थ्यांचे तसेच विज्ञान प्रदर्शन उत्तमरीत्या पार पाडण्यासाठी सहकार्य केलेल्या सर्वांचे संयोजक मुख्याध्यापक नादकर सर यांनी आभार व्यक्त करत या कार्यक्रमाची सांगता केली.

   

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here