Sindhudurg: उपजिल्हा रुग्णालय नवीन इमारतीच्या ठिकाणीच मल्टी स्पेशालिस्ट रुग्णालय होणार

0
23
उपजिल्हा रुग्णालय नवीन इमारतीच्या ठिकाणीच मल्टी स्पेशालिस्ट रुग्णालय होणार

अण्णा केसरकर यांचे आत्मदहन स्थगित

प्रतिनिधी- अभिमन्यू वेंगुर्लेकर

सावंतवाडी –:उपजिल्हा रुग्णालयातील नवीन इमारतीच्या ठिकाणीच तीन मजली इमारत उभारून मल्टी स्पेशलिस्ट रुग्णालय उभारण्याचे प्रस्ताव आरोग्य विभागाच्या प्रधान सचिवांना जिल्हा शल्यचिकित्सक यांनी पाठवले आहे.असे लेखी आश्वासन मल्टी स्पेशलिस्ट रुग्णालय उभारण्यासाठी आत्मदहन करण्याचा इशारा दिलेल्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते वसंत उर्फ अण्णा केसरकर यांना जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागरगोजे यांनी दिला आहे. त्यामुळे केसरकर यांनी हे उपोषण स्थगित केले आहे. याबाबतची माहिती त्यांनी आज येथे आयोजित पत्रकार परिषेद दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here