Sindhudurg: केंद्रीयमंत्री नारायण राणे यांचे हस्ते सिंधुदुर्गनगरी येथे देशातील १६ व्या राष्ट्रीय एससी एसटी हब शाखेचे उद्घाटन

0
99
देशातील १६ व्या राष्ट्रीय एससी एसटी हब शाखेचे उद्घाटन

ओरोस –: देशातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती प्रवर्ग मधील नागरिकांमध्ये उद्योजकता संस्कृती जागृत करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय एससी, एसटी हब २०१६ पासून सुरू केले आहे. त्याची देशातील १६ वी शाखा केवळ सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी माझ्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाच्या माध्यमातून आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरू केली जात आहे.

देशातील अनेक राज्यात एकही याची शाखा सुरू झालेली नसताना मी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एस सी आणि एस टी प्रवर्गातील नागरिकांसाठी वेगळी शाखा सुरू केली आहे. त्याचा लाभ या प्रवर्गातील नागरिकांनी घेवून नोकरी शोधण्या ऐवजी उद्योजक बनून नोकरी प्रदाता बनावे, असे आवाहन केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here