Sindhudurg: कोकण शिक्षक मतदार संघाचे भाजपा उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रेंच्या प्रचारात आघाडी

0
71
कोकण शिक्षक मतदार संघाचे भाजपा उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रेंच्या प्रचारात आघाडी

वेंगुर्ला प्रतिनिधी- कोकण शिक्षक मतदार संघाचे भाजपा उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या प्रचारात वेंगुर्ला तालुक्यामध्ये मुख्याध्यापक संघ, शिक्षक परिषद व भाजपा पदाधिकारी यांनी आघाडी घेतली असून प्रत्येक हायस्कूलमध्ये जाऊन शिक्षक मतदारांच्या वैयक्तिक गाठीभेटी घेतल्या जात आहेत. http://sindhudurgsamachar.in/maharashtra-हिंदूहृदयसम्राट-बाळा/

 मुख्याध्यापक संघाचे सिंधुदुर्ग प्रभारी रमेश जाधव व गुलाब दवने (दोन्ही बदलापूर) यांच्या प्रमुख उपस्थितीत आसोली हायस्कूल, सरस्वती विद्यालय आरवली-टांक, बावडेकर हायस्कूल शिरोडा व माऊली विद्यामंदिर रेडी या चार शाळांमध्ये जाऊन शिक्षक मतदारांना ज्ञानेश्वर म्हात्रे यांना प्रथम पसंतीचे मतदान करण्याचे आवाहन केले.

 यावेळी भाजपाचे प्रसन्ना देसाईतालुकाध्यक्ष सुहास गवंडळकरप्रितेश राऊळरामसिग राणेमनोज उगवेकरबाबली वायंगणकरलक्ष्मीकांत कर्पेमयुरेश शिरोडकरजगन्नाथ राणेमहादेव नाईकसुजाता देसाईगुरु घाडीनंदा गावडेप्रकाश धुरीआनंद धुरीसुषमा खानोलकरप्रार्थना हळदणकरशितल आंगचेकरवृंदा गवंडळकरशिक्षक प्रमोद कांबळेकिशोर सोनसुरकरभावना धुरीएस.एल.जाधवएम.एन.कांबळीचंद्रशेखर जाधवनिवृत्त शिक्षक एस.एस.काळेविष्णू रेडकर उपस्थित होते. यावेळी सर्व शिक्षकांनी उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या पाठीशी असल्याचे सांगितले.

फोटोओळी – भाजपाच्या महिलांनी शिक्षकांची भेट घेऊन ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा प्रचार केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here