Sindhudurg: ‘जबरदस्त सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ वेंगुर्लाच्या रक्तदान शिबिरात ४५ दात्यांचे रक्तदान

0
52
'जबरदस्त सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ वेंगुर्लाच्या रक्तदान शिबिरात ४५ दात्यांचे रक्तदान

वेंगुर्ला प्रतिनिधी- ‘जबरदस्त सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ’ वेंगुर्ला-राऊळवाडा यांनी गरुडझेप महोत्सवांतर्गत शनिवारी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरात ४५ जणांनी रक्तदान केले.

जबरदस्त सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ’ राऊळवाडाने गरुडझेप महोत्सव २०२३ अंतर्गत वेंगुर्ला साकव येथील मीना कॉम्प्लेक्स येथे आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराचे उद्घाटन कलावलय संस्थेचे अध्यक्ष बाळू खांबकर यांच्या हस्ते करण्यात झाले. यावेळी वेंगुर्ला नगरपरिषदेच्या माजी उपनगराध्यक्ष अस्मिता राऊळ, शिवसेनेचे वेंगुर्ला शहर प्रमुख अजित राऊळ, भाजपाचे वेंगुर्ला तालुका अध्यक्ष सुहास गवंडळकर, डॉ. जाई नाईक, सारस्वत बँकेचे जितेंद्र सामंत, श्री.नाईक, माजी नगरसेवक यशवंत किनळेकर, देवेंद्र गावडे, सिंधु रक्त मित्र प्रतिष्ठानचे वेंगुर्ला-सावंतवाडी-दोडामार्ग या विभागाचे अध्यक्ष संजय पिळणकर, जिल्हा उपाध्यक्ष महेश राऊळ, वेंगुर्ला तालुकाध्यक्ष अॅलिस्टर ब्रिटो, सचिव बाबल गवंडे, प्राजक्त रेडकर, अनिल खाडे, जबरदस्त कला क्रीडा सांस्कृतिक मंडळसचे अध्यक्ष साबाजी राऊळ आदी उपस्थित होते. http://sindhudurgsamachar.in/maharashtra-एल-अँड-टी-कन्स्ट्रक्शनच/

क्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी सावंतवाडी रक्तपेढीचे डॉ. आदित्य गर्जे, अधिपरीचारीका मानसी बागेवाडी यांनी तसेच जबरदस्त कला क्रीडा सांस्कृतिक मंडळ राऊळवाडाचे अध्यक्ष साबाजी राऊळ, तसेच मंडळाचे कार्यकर्ते मंगेश परब, सिद्धेश रेडकर, विजय आंदुर्लेकर, अनंत रेडकर, कौशल मुळीक, स्वप्नील पालकर, प्रांजल वेंगुर्लेकर, सागर शिरसाट, बबन आंदुर्लेकर, शिवाजी राऊळ, चिंटू राऊळ, संजय भाटकर, शेफाली खांबकर, मनाली रेडकर, ज्ञानेश्वर रेडकर, विवेक राऊळ, नाथा बोवलेकर, नील नांदोडकर यानी पारश्रम घेतले.

या रक्तदान शिबीर कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचालन मंडळाचे कार्यकर्ते व सामाजिक कार्यकर्ते अजित राऊळ यांनी केले.

फोटोओळी – रक्तदान शिबिराचे उद्घाटन कलावलय संस्थेचे अध्यक्ष बाळू खांबकर यांच्या हस्ते झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here