Sindhudurg: जिल्हा व सत्र न्यायालयाचे निवृत्त अधिक्षक एन.पी.मठकर यांनी आईच्या स्मृतिप्रित्यर्थ राबविला अन्नदानाचा उपक्रम

0
22

वेंगुर्ला प्रतिनिधी- जिल्हा व सत्र न्यायालयाचे निवृत्त अधिक्षक एन.पी.मठकर यांनी आपली आई कै.सौ.रुक्मिणी फटू मठकर यांच्या ५२व्या स्मृतिदिनानिमित्त अणाव येथील आनंदाश्रय या वृद्धाश्रमात अन्नदान केले. दिवंगत आईच्या स्मृतींना उजाळा देताना बहुसंख्य वृद्धांना मायेचा घास दिल्याबद्दल वृद्धांनी त्यांचे आभार व्यक्त केले.

जिल्हा व सत्र न्यायालयाचे निवृत्त अधिक्षक एन.पी.मठकर यांनी आईच्या स्मृतिप्रित्यर्थ राबविला अन्नदानाचा उपक्रम

एन.पी.मठकर यांना सामाजिक कार्याची आवड असून त्यांनी २००९ साली आपल्या आईच्या नावे कै.सौ. रुक्मिणी फटू मठकर चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना केली आहे. या ट्रस्टच्या माध्यमातून त्यांनी आजपर्यंत आरोग्य आणि रक्तदान शिबिरासारखे आरोग्याचे उपक्रम राबविले आहेत. मठकर यांच्या या कार्याची दखल जिल्हास्तरराज्यस्तर तसेच थायलंड-बँकॉक येथेही घेण्यात आली आहे. डॉ.आंबेडकर यांच्या विचारांची प्रेरणा घेऊन आपल्या उत्पन्नातील काही भाग समाजासाठी करुन समाजाचे आपल्यावर असलेले ऋण फेडण्याचा छोटासा प्रयत्न असल्याचे श्री.मठकर यांनी सांगितले. आनंदाश्रय येथे केलेल्या अन्नदानप्रसंगी मधुकर सावंत, मोहन नाईक, बबन परब, चेतन परब उपस्थित होते.http://sindhudurgsamachar.in/उस्मानाबाद-जिल्ह्यातील-अ/

फोटोओळी – आनंदाश्रय या वृद्धाश्रमात केलेल्या अन्नदाबद्दल बबन परब यांनी एन.पी.मठकर यांचे आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here